कोल्हापूर : नागरिकत्व पडताळणी, रामजन्मभूमी खटला, गोवंश, काश्मीरमधील कलम ३७० या देश ढवळून काढणाऱ्या घटना घडत असताना, निधर्मीवादाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या हमीद दलवाई यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. आजच्या या संकटकाळात त्यांच्या निधर्मी विचारांच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे, अशी मांडणी ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक विनय हर्डीकर यांनी केली. धर्मनिरपेक्षतेच्या आधाराने समाजसुधारणेसाठी दलवाई यांनी मांडलेले विचार केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदुधर्मियांनाही लागू पडतात. त्यांचे हे विचार विद्यापीठातील चर्चासत्राच्या सीमारेषा ओलांडून बाहेर नेले पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.‘हमीद दलवाई यांचे साहित्य आणि समाजकार्य’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात ‘भाषा भवन’मध्ये दोनदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता भारती पाटील होत्या. ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट, दलवाई यांच्या कन्या रुबिना चव्हाण, मराठी विभागप्रमुख रणधीर शिंदे, माजी आमदार सुभाष जोशी,‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले हे प्रमुख उपस्थित होते.हर्डीकर म्हणाले, ‘दलवाई यांनी केवळ मुस्लिम धर्मातील व्यंगांवर बोट ठेवले असे नाही, तर त्यांनी धर्माच्या नावाने जे काही चालते, त्याला विचारानेच आव्हान दिले. हिंदू समाजानेही याच विचाराने सत्यशोधन केले असते तर आज वेगळे चित्र दिसले असते. आज दलवाई असते आणि त्यांनी देशातील धार्मिक, सामाजिक परिस्थिती पाहिली असती तर समाजाच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली ध्रुवीकरण करण्याचे जे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, त्यांना वस्तुनिष्ठ चर्चा व टीकेच्या आधारानेच उत्तर दिले असते.
प्रतिकापेक्षा प्रत्यक्ष कृतीची आजच्या घडीला गरज असून, प्रतिकवादातून बाहेर पडून खºया धर्माची चिकित्सा करणे हीच दलवाई यांच्या विचारांशी बांधीलकी ठरेल.’ डॉ.भारती पाटील म्हणाल्या,‘आज विद्यापीठ व शिक्षण संस्थांमध्ये खुलेपणाने बोलण्यावर मर्यादा येत असताना अशा प्रकारची चर्चासत्रे विचारांना दिशादर्शक ठरणारी आहेत. विद्यापीठाने अशा प्रकारचे चर्चासत्र घेतले, हीच मुळात कौतुकाची बाब आहे.’‘साधना’चे विनोद शिरसाट म्हणाले,‘दलवाई यांना जाऊन ४३ वर्षे झाली तरी त्यांच्या विचारांचे भारावलेपण गेली चार दशके टिकून आहे; पण ते पुढेही राहावे यासाठी शिक्षणसंस्था, विद्यापीठ, अभ्यासमंडळानी पुढाकार घेऊन मोठ्या समूहापर्यंत कार्य न्यावे. प्रा.नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. राजेश पाटील यांनी आभार मानले.दलवाई अभ्यासक्रमात का नाहीत?उद्घाटक म्हणून बोलताना राजन गवस म्हणाले, ‘अलीकडे पुरोगामी, निधर्मी, धर्मनिरपेक्षता यांची यथेच्छ टिंगल केली जात असताना दलवार्इंची प्रकर्र्षाने आठवण येते. दलवाई आणि सूफी यांचे नाते तपासण्याची गरज आहे. त्यांचे कार्य आणि साहित्य अभ्यासमंडळावर का आले नाही, अशी खंतही व्यक्त केली.