शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज

By admin | Published: May 18, 2015 11:41 PM

‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) 'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळाकोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)