शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
2
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
3
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
4
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
5
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
6
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
7
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
8
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
9
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
10
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
11
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
12
धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली
13
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
14
Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी
15
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
16
पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह रेट
18
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
19
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
20
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय

मधाबरोबरच परागीकरणाने उत्पादन वाढ

By admin | Published: April 18, 2016 10:55 PM

मधमाशी पालन : कमी खर्चात रोजगार मिळवून देणारा उद्योग; शासनातर्फे अनुदान

शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा मधमाशी पालन व्यवसाय पिकांचे परागीकरण वाढवून उत्पन्नात वाढ करून देणारा आहे. याशिवाय मधाचे पोळे अन्यत्र भाड्याने देऊन आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेण या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून मधमाश्यांच्या पालनाला महत्त्व देणे आवश्यक आहे. यामध्ये रोजगार निर्मितीला वाव असल्याने हा उद्योग शेतीपूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. फळे, भाजीपाला पिकांच्या परागीकरणात मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. मधमाशी पालनाकडे पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचा कल वाढवण्याकरिता शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांना अनुदानसुद्धा दिले जाते. - शिवाजी सावंत, गारगोटीमधपेट्या ठेवण्याची वेळफळबागेतील व फळभाज्या पिकातील फुलोरा ५ ते १० टक्के झाल्यानंतर पेट्या शेतामध्ये ठेवाव्यात.एक हेक्टर पिकासाठी अंदाजे तीन भारतीय माश्यांच्या किंवा दोन युरोपियन माश्यांच्या मधपेट्या ठेवाव्यात. मधमाशी पालनास उपयोगी वनस्पतींची लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते. यामध्ये प्रामुख्याने शेवगा, रिठा, निलगिरी, सावर या वनस्पती लावल्यास मधमाश्यांना वर्षभर अन्नाचा पुरवठा होतो. शेतामध्ये जवळपास मका नेहमी फुलत राहील, अशाप्रकारे मका पेरल्यास मधमाशी पालनास फायदा होतो. पेटीच्या जवळपास विषारी औषध फवारणी करू नये. शक्य नसल्यास पेटीवर पोते ठेवावे किंवा पेट्या कमीत कमी २ ते ३ कि.मी. अंतरावर ठेवाव्यात. फवारणीच्या काळात मधमाश्यांना साखरेचा पाक द्यावा. पेटीतील हवा योग्यप्रकारे खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.मधमाशी पालनाचे फायदे पर्यावरणाचा समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक पिकांमध्ये मधमाश्यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादनात वाढ होते. मधासोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो. कमी खर्चात गावपातळीवर रोजगार मिळवून देणारा हा उद्योग आहे. मधमाशी पालन हा व्यवसाय शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगांशी स्पर्धा करीत नाही. या व्यवसायाला स्वतंत्र जागा, वीज, वाहन, इमारत अशा भांडवली गुंतवणुकीची गरज नाही.४मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्यतो सकाळी मधाच्या हंगामामध्ये आठवड्यामधून किमान एकदा करावी. पोळ्याची स्वच्छता योग्य प्रकारे राखणे आवश्यक आहे. मधमाश्यांची संख्या आणि वाढ पाहण्यासाठी वसाहतीची नियमित देखरेख करावी. ४मधमाश्यांची पेटी ठेवताना चारही पायाखाली पाण्याने भरलेली वाटी ठेवावी. जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाहीत. ज्येष्ठ माशांना काढून सुदृढ नव्या माशांना ब्रूड चेंबरमध्ये नीट बसवावे. आवश्यक वाटल्यास विभाजन बोर्ड बसवावा. ४भारतीय मधमाश्यांसाठी २०० ग्रॅम साखर प्रतिआठवडा प्रतिवसाहत या दराने साखर सिरप मधमाश्यांच्या सर्व वसाहतींना एकाच वेळी द्यावा. वसाहतींमध्ये मधमाश्या पुरेशा प्रमाणात ठेवाव्यात. मधमाश्यांची जास्त गर्दी होऊ देऊ नये. ४राणी माशीला ब्रूड चेंबरमध्येच ठेवण्यासाठी ब्रूड आणि सुपर चेंबर यांच्या दरम्यान राणीला वेगळे करण्याच्या शिटस् ठेवाव्यात. वसाहतीची वेळोवेळी तपासणी करावी. मधाने पूर्ण भरलेल्या फ्रेम सुपरच्या बाजूने काढून घ्याव्यात. ४पूर्णत: बंदिस्त पोळी मध काढण्यासाठी बाहेर काढावी. मध काढून घेतल्यानंतर सुपरमध्ये परत ठेवावीत. मधाने पूर्णपणे भरलेले व रंगाने फिक्कट असलेले पोळे तयार झाले, असे समजावे.