गडहिंग्लज व आजरा तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नेसरीच्या आठवडी बाजाराचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा बाजार चालत आला आहे. आजूबाजूच्या ४० गावांची या बाजारात उलाढाल असते. लाखो रुपयांची उलाढाल होत असते. किरकोळ व घाऊक प्रमाणात व्यापार चालतो. संकेश्र्वर, आजरा व चंदगड तालुक्यातील व्यापारी वर्गासह आजूबाजूच्या खेड्यातील शेतकरी व महिला भाजीपाला घेऊन येत असतात. आता काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बाजार फुलल्याने छोट्या मोठ्या व्यापारी वर्गासह शेतकरी व उत्साहाचे वातावरण आहे. आता हा बाजार पूर्वीच्याच ठिकाणी भरला आहे; मात्र ग्रामपंचायतीने रस्ता खोदला असल्याने ग्राहक व व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा झाली. नेसरी ग्रामपंचायतीने संबंधित रस्ते तत्काळ करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
नेसरीचा आठवडा बाजार फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:28 AM