शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

गडहिंग्लज पालिकेकडून ६ कोटींची निव्वळ करवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:24 AM

गडहिंग्लज : कोरोनाच्या संकटातही गडहिंग्लज शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगरपालिकेच्या करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या थकीत करासह चालू ...

गडहिंग्लज :

कोरोनाच्या संकटातही गडहिंग्लज शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगरपालिकेच्या करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या थकीत करासह चालू वर्षीची मिळून सरासरी ९० टक्क्यांवर करवसुली झाली. शासकीय कर वजा जाता एकूण ६ कोटी १५ लाख ५१ हजार ७८० इतकी निव्वळ करवसुली झाली, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

मुतकेकर म्हणाले, घरपट्टी, शिक्षणकर, रोजगार हमीकर, विशेष स्वच्छताकर, वृक्षकर, अग्निशमनकर, घनकचरा संकलन शुल्क मिळून गेल्या वर्षीचे थकीत ९७ लाख ५७ हजार ५३१ व चालू वर्षीचे ४ कोटी ९ लाख ५४ हजार ३९८ असे एकूण ५ कोटी ७ लाख ११ हजार ९२९ इतके वसुलीचे उद्दिष्ट होते.

निव्वळ वसुलीयोग्य ४ कोटी ९१ लाख २३ हजार ७७३ पैकी ४ कोटी ५७ लाख ८७ हजार ४१४ म्हणजे ९३.४२ टक्के इतकी वसुली झाली.

वाढीव हद्दीतील गतवर्षीचे थकीत ३ लाख २४ हजार ३९५ आणि चालू वर्षीचे ४० लाख ३१ हजार ९५९ मिळून ४३ लाख ५६ हजार ३५४ इतके कर वसुलीचे उद्दिष्ट होते.

निव्वळ वसुलीयोग्य मागणीच्या ४३ लाख ४५ हजार ३११ पैकी ३८ लाख ७९ हजार ४३ रुपये म्हणजेच ८९.०४ टक्के इतकी करवसुली झाली.

याकामी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह सर्व नगरसेवक, लेखापाल शशीकांत मोहिते, करअधीक्षक भारती पाटील, कर सहायक अवंती पाटील, निजानंद मिश्रकोटी, नरेंद्र कांबळे, संतोष घार्वे, भैरू कमते आदींसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, असेही मुतकेकर यांनी सांगितले.

---------------------

* ९२ टक्के पाणीपट्टी वसूल

गेल्या वर्षीची थकीत पाणीपट्टी ३४ लाख ४२ हजार १० रुपये व चालू वर्षीची ९५ लाख ७७ हजार १२० रुपये मिळून १ कोटी २९ लाख १९ हजार १३० इतकी पाणीपट्टी वसुली होती. त्यातील निव्वळ वसुलीयोग्य मागणीपैकी १ कोटी १८ लाख ८५ हजार ३२३ म्हणजेच ९१.९९ इतकी पाणीपट्टी वसूल झाली, असेही मुतकेकर यांनी सांगितले.

-------------------------

*

नागेंद्र मुतकेकर : ०५०४२०२१-गड-०७