कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच असून १३८३ नवे रुग्ण नोंदवण्यात आले असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता पुन्हा चाचण्या वाढवण्यात येणार असल्याने ही संख्या वाढतीच राहणार असल्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर शहरामध्ये गेल्या २४ तासांत ३३७, करवीर तालुक्यात ३०२, हातकणंगले तालुक्यात १५६ नवे रुग्ण आढळले आहेत. मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू हे कोल्हापूर शहरातील आठ आहेत. त्याखालोखाल शिरोळ तालुक्यातील सहा आणि हातकणंगले तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ११ हजार ३६१ सक्रिय रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यांतील एकही मृत्यू झालेला नाही.
चौकट
तालुकावार मृत्यू
कोल्हापूर ०८
लक्षतीर्थ वसाहत, आरकेनगर, कसबा बावडा, यादवनगर, विक्रमनगर, जरगनगर, कळंबा रिंगरोड, संभाजीनगर
शिरोळ ०६
नांदणी, यड्राव, बस्तेवाडी, बड्याचीवाडी, शिरोळ, टाकवडे
हातकणंगले ०५
वडगाव, पुलाची शिरोली, तारदाळ, कबनूर, कोरोची
कागल ०४
करंजिवणे, बामणी, सांगाव, व्हन्नूर
इचलकरंजी ०३
इचलकरंजी, पाटील गल्ली, सहकारनगर
पन्हाळा ०३
खालची गल्ली, बोरपाडळे, जाखले
भुदरगड ०२
चाफेवाडी, कूर
चंदगड ०२
दुंडगे, कुर्तनवाडी
राधानगरी ०२
दाजीपूर, पिंपरीवाडी
करवीर ०१
सांगरूळ
गगनबावडा ०१
मुक्तेश्वर
गडहिंग्लज ०१
माद्याळ
आजरा ०१
उत्तूर