लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : पारदर्शीपणा व काटकसर यांची योग्य सांगड घालत मोठ्या आर्थिक उलाढालीच्या बळावर सहकार क्षेत्रात पन्हाळा तालुक्यातील कोतोलीतील हनुमान पतसंस्था अल्पावधीत नावारूपास आली आहे. या संस्थेने पेठवडगाव येथील भादोले रोडवर स्वमालकीच्या इमारतीमध्ये चौथ्या शाखेचे विस्तारीकरण केले. नूतन शाखेचे उद्घाटन माजी जिल्हा न्यायाधीश विठ्ठलराव तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेने कोतोलीतील मुख्य शाखेसह शाहूपुरी कोल्हापूर, कळे येथे शाखा सुरू केल्या आहेत.
संस्थेची ४० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल सुरू असून, सर्व शाखा अत्याधुनिक व संगणकीकृत बनविल्या आहेत. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन बळवंत पाटील, जि. प. सदस्य शंकर पाटील, नगरसेवक मिरजकर आबा, जवाहर सलगर, रमेश डेलेकर, व्यवस्थापक भीमराव फिरींगे, राज लव्हटे, शाळा कृती समिती अध्यक्ष बाबासाहेब पाटील, डाॅ. स्नेहदीप चौगले, बाबूराव खोत, उत्तम धुमाळ, विश्वास पाटील, प्रधान पाटील, शंकर खोत, यांच्यासह संस्थचेे संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) येथील हनुमान पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उद्घाटन माजी न्यायाधीश विठ्ठलराव वास्कर यांच्या हस्ते करण्यात आले.