शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दहा जानेवारीपर्यंत नवे सहकार आयुक्त

By admin | Published: December 26, 2014 12:44 AM

चंद्रकांत पाटील : दळवी यांचे नाव चर्चेत

विश्वास पाटील - कोल्हापूर =-राज्याचे नवे सहकार आयुक्त दहा जानेवारीपर्यंत नियुक्त होतील, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. सध्या प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांसमवेतच रोज मी काम करीत आहे; त्यामुळे रीतसर आयुक्त नियुक्तीचा विषय सरकारच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहे. दहा जानेवारीपर्यंत नवीन अधिकारी रुजू होईल, असे सहकारमंत्र्यांनी सांगितले.राज्यातील सुमारे अडीच लाख सहकारी संस्थांचा कारभार आयुक्तालयामार्फत चालतो. सध्या अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर यांच्याकडे प्रभारी जबाबदारी आहे. जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांचेही नाव या पदासाठी सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्तांची नियुक्ती कधी होणार, अशी विचारणा सहकारमंत्र्यांकडे केली.दोन्ही काँग्रेसच्या राजकारणाचा सहकारी संस्था हा पाया आहे. त्यावर काँग्रेसवाल्यांची आजही मजबूत पकड आहे; त्यामुळे या संस्थांचे नियमन करणारा अधिकारी आपण म्हणू तसे निर्णय घेणारा हवा, असा आग्रह मागच्या सरकारमधील मंत्र्यांचा राहिला. त्यामुळे थेट ‘आयएएस’पेक्षा पदोन्नतीने ‘आयएएस’ झालेले अधिकारी नियुक्त करण्यास प्राधान्य दिले गेले. असे अधिकारी महाराष्ट्रीय असतात. त्यांना मंत्र्यांचा शब्द मोडणे अवघड बनते. मागच्या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता, राज्यातील सत्तांतर यांमुळे हे पद रिक्त राहिले आहे. आता नवे सरकार स्थिरस्थावर झाल्याने आयुक्तांची नियुक्ती व्हायला हवी. सहकार खाते भाजपकडे आहे व त्या पक्षाला या क्षेत्रात वर्चस्व निर्माण करायचे आहे. मग जे चालू आहे तेच पुढे न्यायचे किंवा सहकाराचे शुद्धिकरण करायचे, असे पर्याय त्यांच्यापुढे आहेत. शुद्धिकरण करायचे असल्यास खमक्या अधिकारी हवा. सध्या आयुक्त नसल्याने या खात्याचे काम काही प्रमाणात दिशाहीन झाले आहे. जे नियमित काम आहे ते अधिकारी नसला तरी बंद होत नाही; परंतु काही महत्त्वाचे निर्णय घेताना प्रभारी अधिकाऱ्यावर मर्यादा येतात. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका, नव्या सावकारी कायद्याची अंमलबजावणी यांसारखे महत्त्वाचे विषय सध्या तोंडावर आहेत. यासाठी तातडीने आयुक्ताची नियुक्ती होण्याची मागणी सहकार क्षेत्रातून होत आहे.नऊ महिने पद रिक्तग्रामीण अर्थकारणाचे महत्त्वाचे अंग असलेल्या सहकार विभागाचे आयुक्तपद गेली नऊ महिने रिक्त आहे. यापूर्वीचे अधिकारी मधुकर चौधरी हे ३० एप्रिलला निवृत्त झाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त झाले.परंतु त्यांच्या रिक्त जागेवर नवीन आयुक्त नियुक्त न झाल्याने त्या विभागाच्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे.