बहिरेश्वर (ता. करवीर) येथे शेतकरी संघर्ष समन्वयक समितीतर्फे आयोजित शेतकरी सभेत गावडे बोलत होते. अध्यक्षस्थानी कोटेश्वर विकास संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ वरुटे होते.
मोदी सरकारने तीन नवे कायदे मंजूर केल्यास शेतकऱ्यांच्या शेती मालाला रास्त भाव मिळणार नाही. शेतकरी नेस्ताबूत होईल, असे सांगून गावडे म्हणाले की, तीन कायद्यांच्या विरोधी आंदोलने सुरू आहेत, त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा.
किसान सभेचे जिल्हाध्यक्ष वाय. एन. पाटील म्हणाले की, देशात शेतकऱ्यांचे प्रश्न वाढत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे.
सभेत नामदेवराव पाटील, संजय पाटील, उपसरपंच सुर्वणा दिंडे, रघुनाथ वरुटे, सीताराम पाटील, बाबा ढेरे, बाळासाहेब पाटील आदिंची भाषणे झाली .
फोटो ओळ - शेतकरी जनजागरण यात्रेनिमित्त बहिरेश्वर (ता. करवीर) येथे आयोजित सभेत नामदेवराव गावडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रघुनाथ वरुटे, सीताराम पाटील, उपसरपंच सुर्वणा दिंडे, नामदेवराव पाटील, संजय पाटील, वाय. एन. पाटील उपस्थित होते.