शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नवीन चार आयुक्तालये

By admin | Published: May 03, 2017 3:44 AM

राज्यात कोल्हापूरसह मीरा-भार्इंदर, अकोला, पिंपरी-चिंचवड या चार ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करावीत, या

कोल्हापूर : राज्यात कोल्हापूरसह मीरा-भार्इंदर, अकोला, पिंपरी-चिंचवड या चार ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करावीत, या मागणीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पोलीस उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या देशातील दुसऱ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उंच ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळ्यासाठी पोलीस महासंचालक माथूर कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यानी खात्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवटसह सात पोलिसांना अद्याप अटक का नाही? या प्रश्नावर माथूर म्हणाले की, ‘त्या’ पोलिसांच्या वर्तनामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश ‘सीआयडी’ला दिले आहेत. त्यांच्या तपासामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आल्यास स्पेशल ब्रँचकडून तपास केला जाईल. या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना खात्यातून बडतर्फ केले जाईल. नांदेडपाठोपाठ कोल्हापुरातही ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) सुरू केली आहे. (प्रतिनिधी) कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅबकोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील ‘व्हिसेरा’ची चाचणी होत आहे. इमारत आणि निधी अशासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सुसज्ज अशी फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात साकारेल, असेही माथूर यांनी सांगितले.