प्रकाश पाटीलकोपार्डे- कोल्हापुरी गुळाला जगात मोठी मागणी आहे. पण याची लज्जत व चव लहान थोरांपर्यंत पोहचवण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून शिंदेवाडी ता. करवीर येथील राजेंद्र वडगावकर या शेतकऱ्याने आयुर्वेदिक व सेंद्रिय गुळाच्या चॉकलेट कँडीचे उत्पादन सुरू आहे. सध्या दररोज २०० ते ३०० किलो चॉकलेटचे उत्पादन सुरू आहे. महाराष्ट्रातच काय देशातील हे गुळ चॉकलेट कँडीचे उत्पादन करणारे एकमेव शेतकरी आहेत.कोल्हापूरच्या मातीत असणाऱ्या गुणधर्मामुळे येथील गुळाची चव व प्रत आरोग्यवर्धक आहे. लोह व कँल्शिअमसाठी कोल्हापूर गुळाचे सेवन लाभदायक असल्याचे आयुर्वेदात नोंद आहे. पण अनेक वर्षापासून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नव्हते.मात्र, शिंदेवाडीचे शेतकरी राजेंद्र वडगावकर यांनी गुळाची चव लहान थोरांना चाखता यावी व तीही माफक दरात कशी देता येईल यावर दोन वर्षे अभ्यास केला. अन्न व औषध प्रशासनाच्या चार लायसन्स बरोबर ही चॉकलेट बनवण्यासाठी यंत्र सामग्रीची जुळवाजुळव सुरू केली. तयार गुळ लवकर थंड होऊ नये यासाठी स्टेनलेस स्टीलचा वाफा, चॉकलेट बनवण्यासाठी सिलिकॉनचे साचे, यासाठी पँकिंग लोगो, मशीन यासाठी १० ते १२ लाख भांडवल गुंतले आहे. गेल्याच आठवड्यापासून आयुर्वेदिक व सेंद्रिय गुळाची १० ग्रँमच्या चॉकलेट कँडीचे उत्पादन सुरू केले आहे. दररोज २०० ते ३०० किलो गुळाची चॉकलेट तयार करण्यात येत आहेत.चॉकलेटमधून किलोला २०० रुपये दरस्थानिक बाजारपेठेत ४० रूपये प्रतिकिलो दर मिळत आहे. मात्र चॉकलेट मधून किलोला २०० रूपये किलो दर मिळणार आहे. यात सुंट,लवंग,वेलची व बडीशेप वापरून चॉकलेट लज्जतदार व आरोग्य वर्धक बनवण्यात आले आहे.
आमचा गुर्हाळघराचा पनजोबा आजोबा पासून ४५ ते ५० वर्षे व्यवसाय आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याचा विचार आला.आणि गुळाची चॉकलेट कँडीची संकल्पना सुचली. मी कंपनी स्थापन केली असून सर्व लायसन्स घेतल्या आहेत. या आयुर्वेदिक गुळ चॉकलेट कँडीला मागणी होत आहे. महाराष्ट्रात हे पहिलेच उत्पादन आहे. - राजेंद्र वडगावकर (गुळ चॉकलेट कँडीचे उत्पादक शिंदेवाडी ता. करवीर)