राहुल पाटील लंडनमधून एमबीए
३६ वर्षांचे राहुल पाटील हे लंडनमधून एमबीए पदवीधर झाले आहेत. दिंडनेर्ली येथील राजीवजी सहकारी सूतगिरणीचे ते अध्यक्ष आहेत. वाचनाची आवड असून अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना मदतीसाठी ते पुढे असतात. आमदार पी. एन. पाटील यांचा राजकीय वारसा त्यांना लाभला आहे. उच्चशिक्षित युवा चेहरा अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेला लाभला आहे. सलग दुसऱ्यांदा त्यांच्या रूपाने करवीर विधानसभा मतदारसंघाला हे पद मिळाले आहे.
चौकट
शिंपीची मोठी राजकीय कारकीर्द
सर्वसामान्य घरातील शिंपी यांनी १९८५ साली आजरा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सुरुवात केली. पाच वर्षे त्यांनी आजऱ्याचे सरपंचपद भूषवले. पाच वर्षे ते आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष तर दहा वर्षे अध्यक्ष होते. जिल्हा परिषदेत १९९७ ते ९८ मध्ये ते बांधकाम समितीचे सभापती तर नंतर चार वर्षे पक्षप्रतोद म्हणून त्यांनी काम पाहिले. आजरा महाल शिक्षण मंडळाचे ते २००७ पासून अध्यक्ष आहेत.
चौकट
नेत्यांच्या विनंतीला मान देऊन बिनविरोध
आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, आमदार पी. एन. पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तर, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनसुराज्यचे नेते विनय कोरे यांना विनंती केल्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी सांगितले.