येथील भारतीय जैन संघटनेतर्फे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या महिला विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी महिला विभागाच्या तालुकाध्यक्षा बिना शहा होत्या. अलका भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भोईटे म्हणाल्या, नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावी. गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. महिला सरपंच व सदस्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपली कर्तव्ये पार पाडावीत.
याप्रसंगी हलकर्णीच्या सरपंच योगिता संगाज, सदस्य विजय शेरवी, गिजवणे ग्रामपंचायत सदस्य आदित्य पाटील, दिव्यांग विद्यार्थिनी रतन गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास किरण संगाज, राजेंद्र मुन्नोळी, भूपाल जोलापुरे, सुधाकर पाटील, संतोष कोरडे, नागराज पाच्छे, निखिल शहा, प्रमोद चेटके, सुलभा शहा, आरती हजारे, तनुजा माळगी, सरिता आडके, वैशाली मेंच, आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष अनिल उंदरे यांनी अहवाल वाचन केले. शर्मिला कुंदप यांनी प्रास्ताविक केले. कविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पद्मजा जिनराळे यांनी आभार मानले.