शिरोळ : राज्यातील पोलीस दलाला अधिक कार्यक्षमपणे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कोरोना काळात गतिमान पोलीस प्रशासन ठेवण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याला नवीन चारचाकी गाडी देण्यात आली आहे. या वाहनामुळे तपासाला गती तर मिळेलच पण नागरिकांच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षादेखील पूर्ण होतील.
पोलीस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत चारचाकी वाहनांची संख्या खूप कमी आहे. त्यातच सध्याची अनेक वाहने जुनी असल्याने त्याची वारंवार करण्यात येणारी डागडुजी डोकेदुखी ठरत असते. शिरोळ पोलीस ठाण्याकडेदेखील अनेक वर्षे वापरात असलेली गाडी होती. तिची डागडुजी करूनच वापर सुरू होता. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नवीन चारचाकी गाडी शिरोळ पोलीस ठाण्याला मिळाली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ तास पोलीस कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या संकटात पोलीस यंत्रणा आणखी गतिमान करण्यासाठी या नवीन गाडीचा उपयोग होणार आहे.
फोटो - १८०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील पोलीस ठाण्याला मिळालेले नवीन चारचाकी वाहन.