संतोष मिठारी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना सेवांतर्गत प्रगती योजनेअंतर्गत करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम (कॅस) पदोन्नती देत नववर्षाची भेट दिली आहे. त्यामुळे या प्राध्यापकांची चार वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यांच्या शिक्षण आणि संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.काही तांत्रिक कारणांमुळे या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण रखडली होती. त्याचा परिणाम या प्राध्यापकांच्या मानसिकतेवर होता होता. ते एकप्रकारे विद्यार्थी आणि विद्यापीठ विकासाला मारक ठरत होते. ते लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या सूचनेनुसार विद्यापीठ प्रशासनाने रखडलेल्या पदोन्नतीची कार्यवाही लवकर पू्र्ण करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राज्यशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागांतील ३० प्राध्यापकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पदोन्नतीची पत्रे या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात दिली जाणार आहेत.नववर्षात पदोन्नतीचे वेळापत्रक ठरविणारदिवाळीपूर्वी कॅसअंतर्गत ३६ प्राध्यापकांना पदोन्नती दिली होती. आता नववर्षाच्या पहिल्या दिवशी ३० जणांना दिली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. सर्व पात्र प्राध्यापकांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने पदोन्नती वेळेवर मिळणे आवश्यक आहे.
पदोन्नतीमुळे काम करण्यातील हुरूप वाढतो. ज्या-त्या वर्षी पदोन्नती मिळणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे वेळापत्रक नववर्षात विद्यापीठ प्रशासनाकडून ठरविण्यात येईल. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.पदोन्नतीची प्रक्रियासाहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांना पुढे सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक अशी पदोन्नती ह्यकॅसह्णअंतर्गत दिली जाते. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता, अर्हता पूर्ण केलेल्या प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे अर्ज करणे आवश्यक असते. अर्ज केल्यानंतर प्रशासनाकडून त्याची छाननी केली जाते. त्यानंतर काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करून, काही प्रकरणांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नती देण्याची कार्यवाही होते.आकडेवारी दृष्टिक्षेपात
- प्राध्यापकांची मंजूर पदे : २६२
- कार्यरत पदे : १३९
- रिक्त पदे : १३०