शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

‘गोकुळ’कडून नववर्षाची भेट

By admin | Published: December 25, 2016 12:04 AM

म्हशीच्या दूध खरेदी दरात रुपयाची वाढ : वासरू संगोपन, संगणक अनुदानात वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) १ जानेवारीपासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया दरवाढ केली आहे. राज्यात ‘गोकुळ’चा दूध खरेदी दर सर्वाधिक आहे. वासरू संगोपन, संगणक, वैरण विकास अनुदानातही भरघोस वाढ करून संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. गुणवत्ता व चवीमुळे ‘गोकुळ’च्या दुधाला बाजारपेठेत मागणी वाढत आहे. मुंबई बाजारपेठेत वार्षिक २३ कोटी ५७ लाख लिटर (रोज सहा लाख ४६ हजार लिटर) म्हणजेच एकूण दुधाच्या ६३ टक्के दुधाची विक्री होते. एकूण दूध विक्रीच्या ८७ टक्के दूध मुबंई, पुणे, कोल्हापूर, गोवा व कोकणात विक्री होते. उर्वरित १३ टक्के दूध दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरले जाते; पण म्हैस दुधाची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असून, तुलनेने गायीचे दूध वाढले आहे. म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी १ जानेवारीपासून खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ केली आहे. त्याचबरोबर जातिवंत जनावरांची पैदास होण्यासाठी सुरू असलेल्या वासरू संगोपन योजनेच्या अनुदानात वाढ केली. पूर्वी म्हशीच्या पहिल्या वेतासाठी सरसकट ७५०० रुपये, तर दुसऱ्या वेतासाठी साडेचार हजार रुपये अनुदान दिले जात होते. आता १ जानेवारीपासून जन्मास आलेल्या मुऱ्हा, मेहसाना व जाफराबादी म्हैस वासरासाठी, तर गीर, साहिवाल, देवणी व थारपारकर देशी गायीसाठी अनुदानात वाढ केली आहे. संस्थांना संगणक खरेदीसाठी २० हजार, तर एक हजार ब्रॉड बॅँड कनेक्शन खर्चासाठी अनुदान दिले जाणार आहे. ज्या संस्थांनी दहा वर्षांपूर्वी संगणक अनुदान घेतले आहे, त्यांना दुबार खरेदी अनुदान देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे. मिल्को टेस्टर रोखीने खरेदी करणाऱ्या संस्थांना ११ हजार, तर क्रेडिटवर खरेदी करणाऱ्यांना ४७०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. कोणत्याही कंपनीचा हायड्रोपोनिक सेट खरेदी केल्यास प्रतिदिनी ५० किलोपर्यंत हिरवा चारा उत्पादन करणाऱ्या सेटसाठी पाच हजार व १०० किलोपर्यंत हिरवा चारा उत्पादन करणाऱ्या सेटसाठी दहा हजार अनुदान देणार आहे. शासनाच्या दरापेक्षा साडेचार रुपये प्रतिलिटर ‘गोकुळ’चा दर जादा असून, राज्यातील उर्वरित संघांपेक्षाही दर आघाडीवर असल्याचेही विश्वास पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पशुसंवर्धन सेवेतही सवलत!संस्थांच्या दूध बिलातून १९९२ पासून पशुसंवर्धन निधीसाठी प्रतिलिटर ५ पैसे कपात केली जात होती. ही कपात १ जानेवारीपासून बंद केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. असा मिळणार उत्पादकाला दरफॅटमिळणारा दर६.५३८ रुपये