कोल्हापूर : नव्या वर्षात आरोग्याची गुरुकिल्ली म्हणून ज्या मॅरेथाॅनकडे पाहिले जाते, त्या राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय अशा ‘लोकमत महामॅरेथाॅन’च्या सहाव्या पर्वाला जसजशी ८ जानेवारी ही प्रत्यक्ष धावण्याची वेळ येईल, त्याप्रमाणे सहभागी होण्यासाठी नोंदणीला धडाकेबाज प्रतिसाद मिळत आहे. फिटनेस अन् आरोग्याच्या मंत्र असलेल्या या स्पर्धेची धावपटूंनाही प्रतीक्षा लागून राहिली आहे. सर्वसामान्यांसह व्यावसायिक धावपटू, संस्था असो वा संघटना सर्वच पातळीवर महामॅरेथाॅनमध्ये नोंदणीसाठी लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ कार्यालयात रीघ लागली आहे.नव्या वर्षात तंदुरुस्त आरोग्यासाठी धावण्यासारख्या चांगल्या व्यायामाची सवय लावायची असेल तर तुम्ही ‘लोकमत’च्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन ती करू शकता. आजच नोंदणी करून आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी व्हा. जसजशी स्पर्धा जवळ येऊ लागली आहे, तसतसा कोल्हापूरकरांतही उत्साह संचारत आहे. धावपटूंसह नवोदितही या महामॅरेथाॅनच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे नोंदणीलाही तितकाच भरघोस प्रतिसाद मिळत आहे.प्रत्येक सहभागी झालेल्या शाळा-काॅलेजमधील विद्यार्थी, व्यावसायिक धावपटू, विविध खासगी, सरकारी आस्थापनांतील कर्मचारी, उद्योजक, व्यावसायिकांना खास ‘लोकमत’चा वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक रंगाचा टी-शर्ट, गुडीबॅग आणि भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त खास प्रकारचे मेडल दिले जाणार आहे.
भरपूर धमाल, मनोरंजनाबरोबर १२ लाखांची बक्षिसेसहभागी होणाऱ्या धावपटूंना आकर्षक रंगाचा जो आजच्या तरुणाईला भावेल असा टी-शर्ट, गुडीबॅग, भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचे चित्र असलेले खास पदक प्रत्येक सहभागी धावपटूला दिले जाणार आहे. याशिवाय ब्रेकफास्ट आणि भरपूर धमाल मनोरंजन. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे १२ लाखांची एकूण बक्षिसे दिली जाणार आहेत.
नोंदणी अखेरच्या टप्प्यातनोंदणी अंतिम टप्प्यात आली असून, जे ग्रुप किंवा वैयक्तिक स्पर्धक अजूनही सहभागी झालेले नाहीत, त्यांनी नाेंदणीसाठी ९६०४६४४४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा. www.mahamarthon.com या संकेतस्थळावरही संपर्क साधू सकता. विजेत्यांना एकूण १२ लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. नोंदणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सहभागी होण्यासाठी अजूनही संधी आहे.
कशी असेल स्पर्धा?कधी : रविवारी (८ जानेवारी)किती वाजता : पहाटे साडेपाच वाजताकुठे : पोलिस परेड मैदान, कसबा बावडा रोड, कोल्हापूरगट किती : २१ किलोमीटर (खुला), १० किलोमीटर, पाच किलोमीटर (फन रन), तीन किलोमीटर (फॅमिली रन)एकत्रित बक्षिसे : १२ लाख व सहभागी सर्वांना सन्मानपदक, गुडीबॅग, टी-शर्ट आणि नाश्ता.
प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य चांगले जपले पाहिजे. यासाठी सकाळी वेळेनुसार व्यायाम करणे आवश्यक आहे. कोल्हापूरमध्ये लोकमत गेल्या सहा वर्षांपासून महामॅरेथाॅन उपक्रम राबवित आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या स्पर्धेतून अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचे सर्व नागरिक धावतात. चांगल्या आरोग्यासाठी चालणे, धावणे, योगासने यासारख्या व्यायामाकडे आज प्रत्येक व्यक्तीने काळजीपूर्वक पाहिले पाहिजे, असे माझे मत आहे. वारणेत क्रीडा क्षेत्राला मोठी परंपरा लाभलेली आहे. या ठिकाणी वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून दरवर्षी राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात. कै. विलासराव कोरे कला क्रीडा मंडळामार्फत वारणा परिसरातील गरीब, गरजू व होतकरू खेळाडूंना अर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये क्रीडा साहित्यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे वारणा परिसरातील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. हेच वारणा परिसरातील खेळाडू लोकमत महामॅरेथाॅनच्या सहाव्या पर्वातही सहभागी होऊन धावणार आहेत. - विश्वेश निपुण कोरे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय मंडळ, श्री वारणा सहकारी बँक, वारणानगर.
आम्ही सहभागी झालो, तुम्हीही सहभागी व्हा
लोकमत महामॅरेथाॅनमध्ये श्री वारणा दूध संघ पावर्डबाय म्हणून सहभागी झाला आहे. या मॅरेथाॅनमध्ये वारणा शिक्षण संकुलातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांना वारणा समूहाचे नेते आमदार डाॅ. विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. मलमे, क्रीडा प्रशिक्षक एस. तिरुज्ञानसंपदम, किशोर घुगे, आर. एन. सातपुते, अभिजित कुंभार, चंद्रकांत मनवाडकर, उदय पाटील, जगदीश शिर्के, नारायण सणगर, आदी उपस्थित होते.
शारीरिक व्यायामाबरोबर योग्य फिजिओथेरपीची जोड दिल्यास दुखापती टाळता येऊ शकतात. लोकमत महामॅरेथाॅनच्या सहाव्या पर्वातही आम्हाला सहभागी होता आले, ही भाग्याची गाेष्ट आहे. -डॉ. प्रसन्नजीत निकम, स्पोर्टस् इन्चार्ज, कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कराड.
पश्चिम महाराष्ट्रातील गरजू लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात कराडातील कृष्णा काॅलेज ऑफ फिजिओथेरपी हे काॅलेज कायम अग्रेसर राहिले आहे. राज्यातील एकमेव काॅलेज आहे, जे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. - डाॅ. जी. वरधराजुलु, प्राचार्य, कृष्णा काॅलेज ऑफ फिजिओथेरपी, कराड.