शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अमावास्येचा उमेदवारांना धसका

By admin | Published: September 23, 2014 12:29 AM

दुसऱ्या दिवशीसुद्धा एकही अर्ज नाही : शेवटच्या तीन दिवसांत उडणार झुंबड

कोल्हापूर : निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा तर त्यासाठी दिवस आणि वेळ चांगलीच असावी, अशा मानसिकतेत अडकलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, निवडणूक प्रक्रिया सुरू होऊनही संपूर्ण जिल्ह्यात दहा मतदारसंघांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशा तीन दिवसांत मात्र अर्ज भरण्यास झुंबड उडणार, हे स्वाभाविक आहे. उमेदवारी अर्जांची मात्र मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आज, सोमवारी करवीरमधून २१, तर कोल्हापूर दक्षिण मधून ९, कोल्हापूर उत्तरमधून ३५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. राधानगरीसाठी ८, कागलमधून १८, इचलकरंजीतून ८, चंदगडसाठी २७, शिरोळसाठी २० अर्जांची विक्री झाली. विधानसभेच्या निवडणुकीची शनिवारी (दि. २०) अधिसूचना जाहीर झाली. त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली. परंतु, सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. या पंधरवड्यात शुभ काम करण्याचे टाळले जाते. पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची मानसिकताही तशीच झाली आहे. गुरुवारी (दि. २५) घटस्थापना आहे. त्यामुळे घटस्थापनेपासून अर्ज भरण्यास खऱ्या अर्थाने इच्छुकांकडून सुरुवात होईल. शुक्रवार हा दिवस उमेदवारी अर्ज भरण्यास सर्वोत्तम असल्याने या दिवशी सर्वच मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून रितसर परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली; पण पहिल्या दिवशी दहाही मतदारसंघांत कोणीच अर्ज भरले नाहीत. आज दुसऱ्या दिवशीही तशीच स्थिती राहिली. आजही कोणीच अर्ज भरला नाही. मात्र, उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. (प्रतिनिधी)