कोल्हापूर : त्रिमुर्ती कॉलनी, कळंबा येथील शिवानी चौगले या तरुणीचा वसगडे गावातील महेश सूर्यवंशी या तरुणाबरोब २५ एप्रिल रोजी विवाह झाला होता. पाच दिवस माहेरी राहण्यास आलेल्या शिवानीने लग्नाच्या १२ व्या दिवशी माहेरी बांधरुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकाराने माहेर व सासरच्या लोकांना धक्का बसला आहे. सीपीआर रुग्णालय आवारात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
माहिती अशी, झारी कामगार म्हणून काम करणारा महेश सूर्यवंशी (वय २१ रा. वसगडे ता.करवीर) याचे व कळंबा येथील सतीश चौगले यांची मुलगी शिवानी यांचा २५ एप्रिल,२०१८ रोजी दोन्ही कुटुंबियांच्या पसंतीने धूमधडाक्यात विवाह झाला होतो. लग्नानंतर शिवानी पाच दिवस सासरी राहिली. त्यानंतर ती माहेरी आली होती. रविवारी महेश व शिवानी दुचाकीवरून जोतीबा देवाचे दर्शन करून आले.
सोमवारी दुपारी पती महेश शिवानीला सासरी नेण्यासाठी येणार होता. त्यापूर्वी शिवानीने माहेरच्या घरात बांधरुमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. तासभर झाला तरी शिवानी बाथरुममधून बाहेर आली नाही, त्यामुळे आईने दरवाजा उघडला तर शिवानीने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. कुटुंबियांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शिवानीने आत्महत्या केल्याचे समजल्यावर सासर व माहेरच्या लोकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. शिवानीची आई, वडील, भाऊ, तसेच पती यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. उत्तरीय तपासणी केल्यानंतर शिवानीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नवविवाहितेने आत्महत्या केल्यामुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. करवीर पोलीसात घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.