गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष विश्वनाथ पट्टणशेट्टी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
अहवाल सालात संस्थेचे एक कोटी ७८ लाख ३७ हजार ९०० रुपये इतके भागभांडवल आहे. ४४ कोटी ७९ लाख ९९ हजार ७९३ रुपयांच्या ठेवी असून, संस्थेला ५६ लाख ५४ हजार ९८२ रुपये इतका नफा झाला आहे.
यावेळी संचालक राजशेखर यरटे, शंकराप्पा दड्डी, अरुण तेलंग, सदाशिव रिंगणे, आप्पासाहेब देवेकर, वीरूपाक्ष वस्त्रद, रावसाहेब पाटील, स्वाती बेल्लद, ममता मजती, सुरेश आजरी, आदी उपस्थित होते.
व्यवस्थापक एस. ए. वाडेकर यांनी अहवालवाचन केले. संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी आभार मानले.
-- २) पार्वती हायस्कूलमध्ये व्याख्यान
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलमध्ये 'आयु-संवाद' या विषयावर व्याख्यान झाले. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या डॉ. मोनिका पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सोनाली शुक्ला यांनी आयुर्वेदातील उपचार पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, उमेश सावंत, गणपती पाटील, आदी उपस्थित होते.