कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकपदी श्रीराम साळुंखे यांची निवड झाली. साळुंखे हे जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहशिक्षकपदी कार्यरत आहेत. या निवडीबद्दल मुख्याध्यापक एस. जी. खाडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ए. बी. मोहिते, एस. के. गुरव, बी. जे. सावंत उपस्थित होते. एस. डी. वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. टी. पाटील यांनी आभार मानले.
शां. कृ. पंत वालावलकर यांची जयंती
कोल्हापूर : येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये सोमवारी शां. कृ. पंत वालावलकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एम. बी. मुडबिद्रीकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपमुख्याध्यापक बी. ए. लाड यांनी वालावलकर यांची माहिती दिली. यावेळी एस. एस. सौंदलगे, व्ही. व्ही. कुलकर्णी उपस्थित होते.
शैक्षणिक शुल्क माफ करा
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी करावे, त्याबाबत संस्था चालकांना सूचना कराव्यात, ज्या शाळा या सूचनेचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी युवक विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेने केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.
साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
कोल्हापूर : कोरोना कालावधीत (दि. १ मार्च ते ३१ डिसेंबर २०२०) प्रकाशित झालेल्या साहित्यकृती, ग्रंंथांना सौ. हौसाबाई पवार ट्रस्ट व राज प्रकाशनकडून पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्या साहित्यिकांची पुस्तके या कालावधीत प्रकाशित झाली असतील त्यांनी त्याच्या दोन प्रती, परिचय दि. १५ जानेवारीपर्यंत प्राचार्य डॉ. जे. के. पवार, हौसाई प्लॉट नंबर ३२, राधाकृष्णनगर, कोल्हापूर- ४१६ ०११ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन पद्मजा पवार यांनी केले आहे.
भारती विद्यापीठात पतंगराव कदम यांची जयंती
कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी संचालक प्रा. रवींद्र मराठे यांनी केले. यावेळी डॉ. के. एम. अलास्कर, आर. डी. जाधव, इंद्रजित देसाई, वैशाली पाटील आदी उपस्थित होते. या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
शाहू महाविद्यालयात हरित शपथ
कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात हरित शपथ उपक्रम झाला. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. एम. गोजारे यांनी विद्यार्थी, शिक्षकांना हरित शपथ दिली. प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा. एन. एस. साळुंखे यांनी पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या घटकांची माहिती दिली. प्रा. भाग्यश्री पुणतांबेकर यांनी प्रास्ताविक केले. माधुरी पाटील यांनी आभार मानले. ज्योती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. बी. घुरके, सायरा मुल्लानी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.