गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत २१९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात अनुक्रमे मधुकर अनंत कवळस (माढा), सरिता देसाई (बेळगाव) व नितीन कांबळे (कोल्हापूर) यांनी यश मिळविले. स्पर्धेसाठी डॉ. काशिनाथ तनंगे, प्रा. धर्मवीर क्षीरसागर, डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी परिश्रम घेतले.
-
--- २) ‘ओंकार’ महाविद्यालयात ‘प्रतिभा’चा सत्कार
गडहिंग्लज : शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवात भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल येथील ओंकार महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिभा दुंडगे हिचा संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी प्राचार्य सुरेश चव्हाण, प्रा. ज्ञानराजा चिघळीकर, प्रा. शर्मिला घाटगे आदी उपस्थित होते.
-- ३) चिकोत्रा प्रकल्पात २० किलोचा कटला मासा
गडहिंग्लज : चिकोत्रा मध्यम प्रकल्पात २० किलो वजनाचा कटला मासा सापडला. या ठिकाणी ठेका पद्धतीने मत्स्यपालन करण्यात येते. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यातून चिकोत्रा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यावेळी महेश कुडवे या तरुणाला हा मासा सापडला.
-
४) प्रियदर्शिनी पतसंस्थेला ‘दीपस्तंभ’ पुरस्कार
गडहिंग्लज : येथील प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेला राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे दीपस्तंभ पुरस्कार मिळाला. गडहिंग्लज येथे संस्थेचे प्रधान कार्यालय असून नेसरी, गारगोटी व कोल्हापूर येथे शाखा आहेत. कोअर बँकिंग प्रणालीचा वापर करणाऱ्या या संस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल सलग दुसऱ्या वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
- ५) प्रियदर्शिनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पाटील, माने उपाध्यक्ष
गडहिंग्लज : येथील प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रूद्रगोंडा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी डॉ. आय. एस. माने यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी सहकारी अधिकारी राजश्री कांबळे होत्या. यावेळी संचालक शिवाजीराव गवळी, आप्पासाहेब पाटील, डॉ. सदानंद पाटणे, डॉ. सीमा पाटणे, अंजली संकेश्वरी, अॅड. विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापक विश्वास देवाळे यांनी आभार मानले.
- रूद्रगोडा पाटील : २७०७२०२१-गड-०१
- आय. एस. माने : २७०७२०२१-गड-०२