पुढील वाढदिवस अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावरच, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 12:06 PM2023-06-15T12:06:43+5:302023-06-15T12:07:09+5:30

'वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे विरोधक जागरूक होतात'

Next birthday will be when Ajit Pawar becomes Chief Minister, Determination of NCP MLA Rajesh patil | पुढील वाढदिवस अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावरच, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा निर्धार

पुढील वाढदिवस अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावरच, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा निर्धार

googlenewsNext

गडहिंग्लज : महाराष्ट्राच्या विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाहिले आहे. त्यासाठीच त्यांनी भाकरी परतवली आहे. परंतु, इकडे भाकरी परतणार नाही याची काळजी घेवूया. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत व चंदगडमध्ये लालदिव्याची गाडी यावी यासाठी मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असे आवाहन करतानाच अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत आपला पुढील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्धार आमदार राजेश पाटील यांनी बुधवारी (१४) केला.

महागाव येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, रामाप्पा करिगार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, वडील स्व. नरसिंगराव, कुपेकर व मंडलिकांच्या शिकवणीतून घडलो. निष्ठावंत कार्यकर्ते व पुरोगामी मतदारांमुळेच आमदार झालो. अजितदादा, जयंत पाटील यांचे पाठबळ आणि हसन मुश्रीफ यांची साथ यामुळेच कोट्यवधींची कामे झाली. यापुढेही चांगले तेच करेन. कुणाचे वाईट करण्याचे पाप करणार नाही.

रेडेकर म्हणाल्या, आमदार पाटील हे स्व. मंडलिक व नरसिंगराव यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. मुकुंद देसाई म्हणाले, आमदार पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळेच कुपेकरांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांची फळी अधिक मजबूत झाली.

यावेळी शिवानंद हुंबरवाडी, अल्बर्ट डिसोझा, अमर चव्हाण, संतोष पाटील, शिवप्रसाद तेली, रघुनाथ पाटील, प्रकाश पाटील, राजेश औरनाळकर, बाळू चौगुले, संगीता पाटील यांचीही मनोगते झाली.

कार्यक्रमास भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, मुन्नासोा नाईकवाडे, लक्ष्मण तोडकर, बाळकृष्ण परीट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अभय देसाई यांनी आभार मानले.

आमदार पाटील म्हणाले...!

- वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे विरोधक जागरूक होतात. वडील नरसिंगराव पाटील यांची एकसष्टी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात साजरी केली. परंतु, दगाफटक्यामुळेच पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दिवंगत आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आणि आपला वाढदिवस एकाच दिवशी येतो. म्हणूनच वाढदिवस साजरा करू नये, अशीच आपली भावना आहे. परंतु, गडहिंग्लजकरांच्या प्रेमामुळेच सलग दुसऱ्यावर्षी वाढदिवसाला यावे लागले.

- नव्या सरकारच्या स्थगितीमुळे राज्यातील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल. महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करावे, जातीयवादी शक्तींना जागा दाखवावी.
 

Web Title: Next birthday will be when Ajit Pawar becomes Chief Minister, Determination of NCP MLA Rajesh patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.