कोल्हापूर कोरोनावरील भारत बायोटेकच्या लसीची ५० जणांना टोचणी करण्यात आली. आता रोज याच पद्धतीने नोंदणी केलेल्या नागरिकांना ही लस टोचली जाणार आहे.
मंगळवारपासून सीपीआरमध्ये ही लस टोचली जात आहे. पहिल्या दिवशी २२ जणांना लस देण्यात आली. दुसऱ्या दिवशी १०१जणांनी नोंदणी केली आहे तर प्रत्यक्षात ५० जणांना लस टोचण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे काम सुरू होते. दुपारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी सीपीआरला भेट देऊन या लसीकरणाच्या कामाची पाहणी केली. या महिन्याअखेरपर्यंत लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
२३१२२०२० कोल चंद्रकांत जाधव
सीपीआरमध्ये सुरू असलेल्या लसीकरण प्रक्रियेची आमदार चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी पाहणी केली.