संचारबंदी लागू असल्याने उद्योग,बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. रोजगार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी वाढेल या भीतीने उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल येथून आलेले कामगार आपापल्या गावांना जात आहेत. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून निघाली. त्यातून परराज्यांतील सुमारे तीनशे मजूर रवाना झाले. या रेल्वेतून जाण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून हे कामगार रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. कोल्हापूरमधून दर गुरुवारी रात्री कोल्हापूर-धनबाद रेल्वे रवाना होते. त्याद्वारे गया (बिहार) पर्यंत झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमधील हे मजूर जातात. आता कोल्हापुरातील उर्वरित परराज्यातील काही मजुरांनी पुढील आठवड्यातील ‘कोल्हापूर-धनबाद’ रेल्वेने जाण्याची तयारी केली आहे. कुटुंबासहीत असलेल्या काही मजुरांनी मात्र कोल्हापूरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
चौकट
चारच रेल्वे सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कोल्हापुरातून धावत असलेल्या विशेष रेल्वे रद्द झाल्या आहेत. त्यात दर शुक्रवारी, सोमवारी असलेली कोल्हापूर-नागपूर रद्द झाली आहे. कोयना एक्स्प्रेस शुक्रवारी रवाना झाली. ती मुंबईहून सकाळी निघाली नाही. त्यामुळे शनिवारी ही रेल्वे कोल्हापूरहून निघणार नाही. सध्या कोल्हापूर-गोंदिया, कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरुपती या रेल्वे सुरू आहेत, अशी माहिती स्थानकप्रमुख ए. आय. फर्नांडिस आणि पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली.
फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०१) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकामध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०२) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
160421\16kol_1_16042021_5.jpg~160421\16kol_2_16042021_5.jpg
===Caption===
फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०१) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकामध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०२) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०१) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकामध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०२) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)