लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : कोतोली ही बाजार पेठ आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने प्रमुख बाजारपेठ असल्याने निधी बँकेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील व्यापारी व शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होत असल्याने ग्रामीण अर्थकारणाला बळकटी मिळत आहे. बाबा अर्बन मल्टिपर्पज निधी लि., कोतोली ही संस्थादेखील भविष्यात ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल, असा विश्वास आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते बाबा मल्टिपर्पज निधी संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
कोतोली बाजारपेठेचा विस्तार वाढत असताना आर्थिक गरजा पुरविण्यासाठी पतसंस्थांची संख्यादेखील वाढत असल्यामुळे लोकांच्या गरजा वेळेत पूर्ण होत असल्याचे मत जि.प. सदस्य शंकर पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी विलास पाटील, सरपंच प्रकाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष मोरारजी सातपुते, दिलीप पाटील, माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, अनिल कंदुरकर, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.
०७ बाबा अर्बन निधी
फोटो : कोतोली (ता.पन्हाळा) येथील बाबा अर्बन मल्टिपर्पज निधी संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डाॅ. विनय कोरे, जि.प. सदस्य शंकर पाटील, अध्यक्ष मोरारजी सातपुते आदी.