दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळी सातत्याने वाढ होत आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद झाली आहे. निलेवाडी -कोडोली मार्गावर ही पाणी आले आहे. कोडोली-चिकुर्डे बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण व पावसाचा इशारा पाहता पुन्हा गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाने केले आहे.
फोटो: २२ निलेवाडी पूल
कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी व सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्ददरम्यान वारणेवरील पूल पाण्याखाली गेला. (फोटो : दिलीप चरणे)