गेले काही दिवस प्रवाहित असल्यामुळे पाणीदार असणारी पंचगंगा आता प्रदूषणामुळे तसेच पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे केंदाळाने आच्छादली गेली आहे. या केंदाळाखाली श्वास गुदमरलेली पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीची आर्त हाक देत आहे, पण तिची हाक ऐकण्यास वेळ कोणाला आहे ? उलट दरवर्षी वाढत्या प्रदूषणामुळे तिच्या मरणयातना वाढतच आहेत. शरोली पुलाची येथील पंचगंगा नदीच्या पात्राची ही अवस्था तिचे भयाण रुप दर्शवीत आहे.
नेमिची येते केंदाळ...!
By admin | Published: May 13, 2016 12:51 AM