शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 2:22 PM

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी  १७.१० फुटांपर्यंत पोहोचली असून, नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली, धरणक्षेत्रात जोरदार पाऊसराधानगरीतून प्रतिसेकंद ११००चा विसर्ग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी मंगळवारी १७.१० फुटांपर्यंत पोहोचली असून, नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी कोल्हापूर शहरात दिवसभर चांगला पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला, तर हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत पावसाची नोंद आहे.

धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ११०० घनफूट  तर कोयनेतून २१११ घनफूट  विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीची पातळी १७ फुटांवर गेली आहे. पाच बंधारे पाण्याखाली गेले असून, राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने वडणगे मार्ग, तर गगनबावडा ते गगनगिरी मार्गावरील मोरी वाहून गेल्याने रस्ते बंद आहेत.सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १९.५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गवसे सर्कलमध्ये १४२, तर राधानगरी सर्कलमध्ये ७४ मिलिमीटर पाऊस झाला.जिल्ह्यातील राधानगरी धरणात ९७.९४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून११००  तर कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली व भोगावती नदीवरील हळदी असे नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३५.६१ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ७४.०५१ इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये  पाणीसाठा 

तुळशी ४३.२१ दलघमी, वारणा४५१.७० दलघमी, दूधगंगा ३३२.५२ दलघमी, कासारी ३५.९९ दलघमी, कडवी २८.०५ दलघमी, कुंभी ३७.८० दलघमी, पाटगाव ५०.६९  दलघमी, चिकोत्रा १७.४२ दलघमी, चित्री १६.७३  दलघमी, जंगमहट्टी १०.३० दलघमी, घटप्रभा  ४४.१७ दलघमी, जांबरे १९.६३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे राजाराम १७.१० फूट, सुर्वे १८.१० फूट, रुई ४५.९ फूट, इचलकरंजी ४२ फूट, तेरवाड ३९.९ फूट, शिरोळ ३१.९ फूट, नृसिंहवाडी २४.९ फूट, राजापूर १६ फूट तर नजीकच्या सांगली ८ फूट व अंकली ९.६ फूट अशी आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर