यावेळी बोलताना प्राचार्य अर्जुन आबीटकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या काळात सर्जेराव मुगडे यांनी केलेली मदत अतिशय मोलाची आहे. त्यांचा आदर्श घेऊन तालुक्यातील दात्यांनी मदतीसाठी पुढे यावे.
गारगोटी कोविड सेंटरमध्ये सुमारे २०० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. इतक्या लोकांवर एकाचवेळी उपचार करणे, त्यांच्या प्रकृतीचे उतार-चढाव पाहणे आणि लक्षणांवर आधारित उपचार करणे हे खूप कठीण काम असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम म्हणाले. कठीण प्रसंगात मुगडे यांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणार्थ दिलेल्या औषध गोळ्यांचा हा मोठा साठा येथील रुग्णांचा जीव वाचवणारा, त्यांना लवकर आजारातून बरे करणारा ठरला आहे. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, भुदरगड तालुका पंचायत समितीचे उपसभापती सुनील निंबाळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर, डॉ. सचिन सुतार, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश शिंदे, विजय सारंग, फार्मसिस्ट प्रसाद जंगम, ग्रामपंचायतीचे सदस्य सुशांत सूर्यवंशी, रणधीर शिंदे, दिलीप देसाई, संतोष सातपुते, राजेंद्र चिले, सूर्यकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
१३ गारगोटी मेडिसीन
फोटो ओळ
गारगोटी येथील कोविड सेंटरला औषधे प्रदान करताना सर्जेराव मुगडे, सोबत अर्जुन आबिटकर, डॉ. यत्नाळकर, डॉ. मिलिंद कदम, डॉ. डवरी, विजय सारंग आदी.