शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

‘चिकोत्रा’चे नववे आवर्तन २ जूनला-: पाऊस लांबण्याच्या अंदाजाचा परिणाम, पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:16 AM

मान्सूनचे आगमन उशिरा होण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने चिकोत्रा पाटबंधारे विभागाने सतर्कता बाळगण्याच्यादृष्टीने नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीत धरणातून २८ मे रोजी सोडण्यात येणारे पाणी २ जूनला

ठळक मुद्देउपसाबंदी

दत्ता पाटील ।म्हाकवे : मान्सूनचे आगमन उशिरा होण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने चिकोत्रा पाटबंधारे विभागाने सतर्कता बाळगण्याच्यादृष्टीने नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीत धरणातून २८ मे रोजी सोडण्यात येणारे पाणी २ जूनला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीवर २ जून ते ११ जूनपर्यंत उपसाबंदी करण्यात आली आहे. तसेच शेतीसाठी हे शेवटचे पाणी असून, पावसाचे आगमन लांबले तर बंधाऱ्यांचे सर्व बरगे काढून केवळ पिण्यासाठी नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.

चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील पिण्यासह शेतीच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून असणारे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरण केवळ दीड टीएमसी क्षमतेचे आहे. तरीही यंदा जादा पावसाच्या नोंदीमुळे पाच ते सहा वर्षांनंतर हे भरले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत प्रशासनावर ताण आलेला नाही. यंदा नोव्हेंबरपासून एप्रिलअखेर ८ आवर्र्तने देण्यात आली आहेत. तर आगामी ९ वे आवर्तन देण्याचे नियोजन सुरू आहे.सध्या, धरणात ५०० एमसीएफटी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी आगामी आवतर्नासाठी १५० एमसीएफटी पाणी लागणार आहे.अनुभवामुळे सुधारणागतवेळी धरणात अवघा ६६ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे सात आवर्तनाचे नियोजन केले होते. मात्र, सुरुवातीच्या तीन ते चार आवर्तनावेळी मोठ्या प्रमाणावर उपसाबंदी झुगारून अवैध पाणी उपसा केला. त्यामुळे चिकोत्रा खोºयात पाणीबाणी निर्माण झाली होती. त्यामुळे २८ मे ते ६ जूनऐवजी २ जून ते ११ जून असा बदल केला आहे.उपसाबंदीसाठी पोलीस बंदोबस्तउन्हाळ्यात शेवटच्या बेळुंकी बंधाºयापर्यत पिण्याचे पाणी लवकर पोहोचविण्यासाठी काटेकोर उपसाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे यावेळी उपसाबंदी काळात पाणी उपसा करणाऱ्यांना चाप लागणार आहे. 

पाऊस लांबला तर पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे आवर्तन सहा दिवस उशिरा सोडण्याचे नियोजन केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे यावेळी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे गृहीत धरून उपसाबंदी काटेकोर ठेवण्याचेही नियोजन केले आहे.- उत्तमकुमार कापसे, उपअभियंता,  वेदगंगा-चिकोत्रा, गारगोटी

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर