कोल्हापूर - कॉ गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) दिला आहे. पानसरे यांच्या तिस-या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पेठेतील लाड चौकात 'निर्भय बनो' मॉर्निंग वॉक काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
पानसरे यांच्या तिसऱ्या विवेकवाद्यांच्या हत्येबद्दल सरकारला काहीच वाटत नाही. तीन वर्षे झाली तरी मारेकऱ्यांना पकडले जात नाही ही खेदाची गोष्ट असल्याची टीका मेघा पानसरे यांनी यावेळी केली. यावेळी उमा पानसरे, मेघा पानसरे, प्राचार्य टी ऐस पाटील, व्यंकप्पा भोसले, उदय नारकर, संभाजीराव जगदाळे, वसंत मुळीक आदी मान्यवर सहभागी झाले होते. समाजातील सर्व स्तरातील मान्यवर, महिला, तरुण कार्यकर्तेदेखील या फेरीत सहभागी झाले. 'जवाब दो..जवाब दो..फडणवीस सरकार जवाब दो. आम्ही सारे पानसरे...'अशा घोषनांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.