शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नीतेश राणे : वळसंगमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रारंभ,

By admin | Published: February 11, 2017 11:32 PM

राज्य सरकार विश्वासघातकी भाजप-शिवसेनेवर टीका

संख : राज्यातील भाजप-शिवसेना सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये, निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. हे सरकार विश्वासघातकी आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला पैसे नहीत, मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जाहिरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे. या सरकारची आर्थिक कुवत नाही, असा आरोप आ. नीतेश राणे यांनी केला.वळसंग (ता. जत) येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कॉँग्रेस प्रचार सभेत ते बोलत होते. प्रचाराचा प्रारंभ राणे यांच्याहस्ते करण्यात आला. स्वागत उपसरपंच मनीष चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक उद्योगपती सतीश चव्हाण यांनी केले. सतीश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.आ. राणे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये लोकांना आश्वासने दाखवून मते मिळविली. भोळ्याभाबड्या जनतेने आश्वासनाला बळी पडून परिवर्तन केले; पण अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलेले नाही. आत्महत्यांचे सत्र वाढत चालले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता जाब विचारण्याची गरज आहे. आम्ही विधिमंडळात कर्जमाफी करण्यासाठी मागणी केली. परंतु कर्जमाफी करण्याची आर्थिक क्षमताच त्यांची राहिलेली नाही. राज्यात कोपर्डीसारखी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा, सुव्यवस्था सुरक्षित राहिली आहे काय? असा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली.सध्याचे सरकार हे नालायक लोकांचे सरकार आहे, असे मी म्हणत नाही, तर सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरेच म्हणतात. शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्यावर भेटायला गेले होते. बाहेर येऊन राजीनाम्याचे पत्र दाखवितात. हा पोरखेळ चालविला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे असते तर तोंडावर राजीनामा फेकला असता. हे सत्तेत चिकटून बसलेले आहेत. कॉँग्रेसला सत्ता द्या. आम्ही मराठा, धनगर, लिंंगायत समाजाला आरक्षण देऊ. तालुक्यातील प्रश्न मार्गी लावू. कॉँग्रेसच्या पाठीमागे उभा राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.यावेळी जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील, विक्रम सावंत, नाना शिंदे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, माजी जि. प. सदस्य आप्पाराय्या बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगराध्यक्ष इकबाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, पं. स. सदस्य प्रकाश भोसले, साहेबराव टोणे व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते. उमाजीराव सनमडीकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)चौकशीची मागणीजत तालुक्यामध्ये एमआरजीएस योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुगांची हवा खायला पाठविले पाहिजे,अशी मागणी यावेळी राणे यांनी केली.