कोल्हापूर : माने गट संपविण्यासाठी हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांनी कूटनीती केली. यामुळे मला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही याचा राग मला अनावर झाल्यामुळेच आमच्या बंगल्यातील खिडकीच्या काचेत मुश्रीफ यांचा चेहरा दिसू लागला आणि मी माझ्या हाताने ती काच फोडली. यात हाताला गंभीर जखम होऊन ४५ टाके पडलेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता माने यांचे कनिष्ठ चिरंजीव सत्त्वशील यांनी आज, बुधवारी सांगितले. दोन भावांतील उमेदवारीच्या संघर्षातून सत्त्वशील यांनी काल, मंगळवारी हाताची नस कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी हा खुलासा केला. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून सत्त्वशील माने यांनी हाताची शीर कापून मंगळवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरोळ व इचलकरंजी मतदारसंघांतील धैर्यशील व सत्त्वशील या दोन भावांतील उमेदवारीच्या संघर्षातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत होते.
निवेदिता मानेंच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न!
By admin | Published: October 01, 2014 9:45 PM