शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

निविदेलाच गेले ५२२ दिवस;सातारा-कागल रस्त्याचे काम : सहापदरीकरणाच्या निविदेची २२ शुद्धिपत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:30 AM

संतोष पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची ...

संतोष पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा अंतिम करण्याचे काम गेले ५०६ दिवस सुरू आहे. २२ डिसेंबर २०१७ पासून सुरू असलेली ही प्रक्रिया २९ मे २०१९ ला सकाळी अकरा वाजता संपण्याची आशा आहे. या कालावधीत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचआय) तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक काढून निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली. या ४६.५ किलोमीटर कामाची मुुदत ७३० दिवसांची आहे; परंतु निविदा प्रक्रियाच तब्बल ५२२ दिवस लांबली आहे. परिणामी, ‘डी.एस.आर.’नुसार कामाची किंमत किमान २०० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.मुंबई-चेन्नई हायवे (एनएच ४८) हा पुणे-सातारा-बंगलोर-चित्तूर आणि चेन्नई, आदी प्रमुख दहा शहरांतून जातो. महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांतून तब्बल १४१९ किलोमीटरचा हायवे आहे. १९९९ साली स्वर्णिम चतुर्भुज योजनेत मुंबई-चेन्नई हायवेचे चौपदरीकरण झाले.महाराष्टÑातील ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी, चित्तूर, टूमकूर, आदी शहरांतून हा महामार्ग आहे. ५८४६ किलोमीटरच्या स्वर्णिम चतुर्भुज योजनेत ९० टक्के रस्त्यांचे सहापदरीकरण पूर्ण केले आहे. त्यातील मुंबई-पुणे २००० साली जलदगतीने एक्स्प्रेस वे केला गेला. मात्र, त्यानंतर राज्यातील रुंदीकरण कासव छाप ठरले.एनएचआयच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालात सातारा-कागल या १३३ किलोमीटरच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. १४१९ किलोमीटरच्या रस्त्यातील ६७८.५०० ते ७२५ किलोमीटर दरम्यानचा ४६.५० किलोमीटरचा सातारा-कागल दरम्यानचा टप्पा क्रमांक ३ या रस्त्याचे सहापदरीकरण ठरले. त्यानुसार ‘एनएचआय’ने २२ डिसेंबर २०१७ ला दुपारी ५.४० वाजता १२० दिवस मुदतीची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. मात्र, ही निविदा आजपर्यंत उघडलीच नाही.आता २८ मे २०१९ पर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख असून, २९ मे २०१९ ला सकाळी अकरा वाजता निविदा उघडली जाणार आहे. या ५०६ दिवसांच्या काळात ‘एनएचआय’ने तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक काढले. २८ फेब्रुवारी २०१९ ला सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी शेवटचे २२ वे शुद्धिपत्रक काढण्यात आले. त्यात पुन्हा बदल करून एका मिनिटाच्या अवधीत पुन्हा ५ वाजून १८ मिनिटांनी रिवाईज केले. आता पुन्हा शुद्धिपत्रक न निघाल्यास सातारा-कागल रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील कामास २९ मे २०१९ ला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.डीएसआरनुसार २०० कोटींची वाढसातारा-कागल सहापदरीकरणातील ४६.५० कि.मी.च्या रस्त्यासाठी एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा २२ डिसेंबर २०१७ला प्रसिद्ध झाली. १२० दिवसांची निविदा प्रक्रिया पावणेदोन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबली. जिल्हा दरसूची (डी.एस.आर.) दरवर्षी सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढते. ‘डी.एस.आर.’ वाढीनुसार प्रकल्प खर्च वाढीचे प्रयोजन निविदेच्या अटी, शर्थीत असल्यास मूळ प्रकल्प खर्चात किमान २०० कोटी रुपयांची वाढ होईल.