शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
2
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
5
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
6
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
7
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
8
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
9
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
10
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
11
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
12
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
13
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
14
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
15
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
16
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
17
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
18
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
19
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
20
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले

मनपा निवडणूक २९ आॅक्टोबरला शक्य

By admin | Published: September 20, 2015 1:31 AM

पालकमंत्र्यांचे सूतोवाच : ऐन गणेशोत्सवात राजकारण तापले; इच्छुकांचे फलक

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख किती? याबाबत शहरवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच शनिवारी सायंकाळी फुलेवाडी प्रभाग क्र.७२ मध्ये एका कार्यक्रमात निवडणूक २९ आॅक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीच्या वातावरणाने शहरात राजकारण दिवसेंदिवस तापू लागले आहे. प्रत्येक नेत्याने आपल्या सोयीने आघाड्या तयार केल्या आहेत. प्रत्येक पक्ष-आघाड्यांनी प्रभागवार उमेदवार चाचपणी करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. या मुलाखती घेण्यात प्रथम भाजप-ताराराणी महायुतीने बाजी मारली. त्यानंतर इतर पक्षांनीही इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या. गणेशोत्सव मंडळांसमोर उमेदवारांच्या स्वागत कमानीवरही इच्छुकांच्या छबी झळकू लागल्या आहेत. काही आघाड्यांच्या उमेदवारांची पहिली यादीही तयार झाली आहे, फक्त जाहीर करणे बाकी आहे. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी येत्या २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. महापालिका प्रशासनाकडून शनिवारी सायंकाळी प्रभागनिहाय मतदारयाद्या जाहीर झाल्या. त्यावर हरकतींचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे कदाचित २८ अगर २९ सप्टेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार तीस दिवसांनी म्हणजेच दि. २९ आॅक्टोबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फुलेवाडी येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या कार्यक्रमातील जाहीर सभेत महापालिकेची निवडणूक दि. २९ आॅक्टोबर रोजी होण्याची शक्यता व्यासपीठावरून व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी ही शक्यता जाहीरपणे व्यक्त केल्याने त्यावेळी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.