सचिन भोसले- कोल्हापूर महापालिकेने तरुणांना व्यायामाची गोडी लागावी म्हणून कोल्हापूर शहरात नव्वदीच्या दशकात व्यायामशाळा सुरू केल्या. मात्र, योग्य नियोजनाअभावी या व्यायामशाळा ओस पडू लागल्या आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बहुतांशी व्यायामशाळा केवळ शोभेच्या इमारती बनून राहिल्या आहेत. तत्कालीन महापालिका महासभेने शहरातील काही भागांत उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या जागेत व्यायामशाळांची निर्मिती केली. तत्कालीन आमदार बाबूराव धारवाडे यांच्या निधीतून या व्यायामशाळांना साहित्यही पुरविण्यात आले. मात्र, यानंतर साहित्याची नव्याने डागडुजी किंवा त्यात भर घातली नाही. परिणामी या व्यायामशाळांकडे युवकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ४ ते ८ या वेळेत या व्यायामशाळा उघड्या असतात. प्रशिक्षक नसल्यास व्यायामासाठी आलेल्या तरुणांकडून उघडल्या व बंद केल्या जातात. सध्या बावडा उलपे हॉल, शाहूपुरी, विक्रमनगर या व्यायामशाळेत नव्याने साहित्याची खरेदी केली आहे. अन्य ठिकाणी जुन्या साहित्यांवर युवक व्यायाम करत आहेत.नव्वदीच्या खरेदीतील साहित्यावर होतोय व्यायामसुरुवातीच्या काळात जेवढे व्यायाम साहित्य या व्यायामशाळेत घेतले, तितकेच व्यायामाचे साहित्य या शाळांमधून आहे. नव्याने केवळ शाहूपुरी, उलपे मळा, विक्रमनगर या व्यायामशाळांत नवीन अत्याधुनिक साहित्य खरेदी केले आहे. बाकीच्या व्यायामशाळांत पूर्वीचेच व्यायाम साहित्य आहे. उपस्थिती वाढीसाठी शून्य प्रयत्नमोक्याच्या जागी असणाऱ्या या व्यायामशाळेत युवकांची गर्दी व्हावी, त्यातून व्यायामाची गोडी वाढावी, याकरिता महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून कोणतेही प्रयत्न आजतागायत केलेले नाहीत. यातील काही प्रशिक्षकांना तर अतिक्रमण काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांसारखे अधिकाऱ्यांबरोबर पाठविले जाते.कर्मचारी संख्याया व्यायामशाळांकडे एकूण १५ प्रशिक्षक होते. त्यातील एक प्रशिक्षक मागील वर्षी निवृत्त, तर दोन कर्मचारी रोजंदारीवर, तर एक कर्मचारी बॅडमिंटन कोर्टकडे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. व्यायामशाळांचे सर्व व्यवहार इस्टेट विभागाकडून पाहिले जातात. कर्मचाऱ्यांची हजेरीही या विभागात मिळत नाही. त्याचबरोबर कर्मचारी कामावर आहे की नाही, हेही कळत नाही. त्यामुळे व्यायामशाळांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे हेच कळत नाही.शहरात १४ व्यायामशाळामहापालिकेच्या वरुणतीर्थ, दुधाळी, फुलेवाडी, मंगळवार पेठ (नागेशकर), हळदकर, आंबेडकर व्यायामशाळा, उलपे मळा (बावडा), बावडा पॅव्हेलियन, भोसलेवाडी, जाधववाडी, विक्रमनगर, राजारामपुरी, गवत मंडई, शाहूपुरी व्यापारपेठ व्यायामाचे धडे चालतात १९९० च्या खरेदी केलेल्या साहित्यावर उलपे मळा, शाहूपुरी, विक्रमनगर येथेच केवळ नवीन साहित्यजागा मोठ्या, मात्र उपस्थिती कमीच
महापालिकेच्या व्यायामशाळा अशक्त--जागा मोठ्या, मात्र उपस्थिती कमीच
By admin | Published: February 19, 2015 12:25 AM