शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:25 AM

कोल्हापूर : अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच न आल्याने अखेर नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्या वाहनातून जखमीला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात ...

कोल्हापूर : अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच न आल्याने अखेर नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्या वाहनातून जखमीला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पोहोचविण्याची वेळ आली. मंगळवारी सायंकाळी सातच्यासुमारास साजणी येथे हा अपघात घडला.

नवमहाराष्ट् सूतगिरणीसमोरच एक अल्टो कार आणि दोन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नागरिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकाला फोन केला. काही वेळातच पोलीस दाखल झाले. परंतु अर्धा तास झाला तरी रुग्णवाहिकेचा पत्ता नव्हता. याचदरम्यान आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजीकडे निघाले होते. त्यांनी उतरून अपघाताची परिस्थिती पाहिली. त्यांनी आणि त्यांचे स्वीय सहायक अमाेल नांदरे यांनीही रुग्णवाहिकेसाठी फोन लावून कल्पना दिली. तरीही पंधरा मिनिटे उलटल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर आवाडे यांनी त्यांच्या नवमहाराष्ट्र सूतगिरणीची गाडी उपलब्ध करून देऊन जखमीला त्या गाडीतून सीपीआरला पाठवून दिले. सोबत एक कामगारही दिला. अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संंबंधितांना याबाबत विचारणा करणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.