आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0६ : समाजातील गोरगरीबांसाठी संजय गांधी पेन्शन योजना आधारवड असून करवीर तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत १५४ लाभार्थींना मंजूरी पत्रे वाटप आमदार नरके, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र दिवसे व कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळ ते बोलत होते.
आमदार नरके म्हणाले, संजय गांधी योजनेतील अनुदानात भरीव वाढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मध्यंतरी काही पात्र लाभार्थींना अपात्र ठरविले होते. आगामी काळात त्यांना पुन्हा लाभ मिळवून देऊ. गेले तीन महिन्यात पेन्शन योजना तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केल्याचे राजेंद्र दिवसे यांनी सांगितले.
‘कुंभी’चे संचालक संजय पाटील, हणमंतवाडी सरपंच प्रियांका शिनगारे, बाजार समितीचे संचालक संजय जाधव, बाजीराव शेलार, योगेश ढेंगे, राम पाटील, विलास ढेंगे, तानाजी नरके, संग्राम भापकर, अजित चौगुले, प्रकाश चौगुले, सुभाष पाटील, बाबासाहेब निगडे, सर्जेराव दिवसे, सर्जेराव निगडे, वसंत पाटील, शिवाजी ढेरे, उत्तम निगडे, शरद निगडे, संदीप गायकवाड, उत्तम गायकवाड, अमृत दिवसे उपस्थित होते. संभाजी चौगुले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अजित तांबेकर यांनी मानले.
आम्ही डांगोरा पिटत नाही!
करवीर मतदारसंघातील गाव तिथे विकासकामांच्या माध्यमातून कामांचा डोंगर उभा केला आहे, त्याप्रमाणे आमचे कार्यकर्तेही विविध योजनांच्या माध्यमातून काम करतात पण कामांचा कधी डांगोरा पिटत नसल्याचा टोलाही आमदार नरके यांनी विरोधकांना लगावला.