कागल : लसीकरणाला अजिबात घाबरू नका. सर्वांनीच शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करून घ्या. लसीकरणावेळी गर्दी करून संसर्ग वाढवू नका, असे आवाहन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी आज घेतला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, लसीकरणाच्या मोहिमेची सुरुवात झाल्यावर पहिल्या टप्प्यात नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. लसीकरणाबाबत भीती, गैरसमज, अफवा अशी अनेक कारणे होती. परंतु; आता सर्वांच्याच लक्षात आलं आहे की लसीकरणामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच सरकार लसीकरण करणार आहे त्यावेळी गोंधळ, घाई-गडबड व गर्दी करून कोरोना संसर्ग वाढवू नका, यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. सुनीता पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
२७ मुश्रीप
फोटो.
कागल -
ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. या वेळी डाॅ. सुनीता पाटील, जफार नायकवडी.