शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

चुकीला माफी नाही : नुतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 4:24 PM

पोलीस खात्यात अनावधानाने चूक झाल्यास दुर्लक्ष करु, पण जाणून बुजून चुक करणाऱ्याला कदापिही माफी नाही, असा इशारा नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. जिल्ह्यातील गेल्या अडीच वर्षातील चांगले काम टिकवून ठेवणार,त्यातूनही अवैद्य व्यावसायिकांनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ठेचून काढू असाही इशारा दिला.

ठळक मुद्देचुकीला माफी नाही : नुतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेपदभार स्विकारला, गुंडांना ठेचून काढण्याचा इशारा

कोल्हापूर : पोलीस खात्यात अनावधानाने चूक झाल्यास दुर्लक्ष करु, पण जाणून बुजून चुक करणाऱ्याला कदापिही माफी नाही, असा इशारा नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. जिल्ह्यातील गेल्या अडीच वर्षातील चांगले काम टिकवून ठेवणार,त्यातूनही अवैद्य व्यावसायिकांनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ठेचून काढू असाही इशारा दिला.

नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी बुधवारी सकाळी प्रभारी पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. लोकांचा पोलिसावरील विश्वास टिकला पाहिजे, त्यासाठी यंत्रणा सक्षम करणार, पोलिसांच्या कामात पारदर्शकता ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.ते म्हणाले, पोलीसांकडून सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. चुकीच्या पध्दतीने वागणाऱ्याला ठेचून काढू, मग ते पोलीस असो अगर अवैद्य व्यावसायिक. सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर सोडविले जातील. पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे कोणाचाही दबाव न घेता काम करतील, त्यासाठी आवश्यक ते पाटबळ देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार आहे.

आर्थिक फसवणुकीचे, आॅनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढले. यातील आरोपींना शोधणारे ज्ञान, कौशल्य पोलिसांना आत्मसात करावे लागणार आहे. अवैद्य व्यावसायिकांना ठेचून काढणार, कोणतेही गैरप्रकार जिल्ह्यात खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासनाचा कारभार लोकाभीमूख करण्यासाठी आवश्यक ते बदल करणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करु.विश्वासाचा एक टप्पा पुढे राहूगेल्या अडीच वर्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील सक्षम काम पुढेही विश्वासाने टिकवून ठेवू, कदाचित एक टप्पा पुढे राहू, असेही बलकवडे म्हणाले.कोल्हापूरचे प्रेमअडीच वर्षापूर्वी गडचिरोलीचा पदभार डॉ. अभिनव देशमुख यांच्याडून स्विकारला. आता पुन्हा कोल्हापूरचाही पदभार स्विकारला, हा योगायोग असून कोल्हापूरवरचे प्रेम असल्याचेही त्यांनी मिस्कीलपणे सांगितले.

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर