कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी) साध्या पद्धतीने बाप्पांचे विसर्जन केले. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून दिसून आले आहे. या पाहणीमधील निरीक्षणांबाबतच्या अहवालाची माहिती या विभागाने दिली.पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रभारी प्रमुख डॉ. ए. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, अजय गौड, एम. एस्सी. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी योगेश गलगले, अनिकेत मोराळे ध्वनी पातळी मापनाचे काम केले. त्यांनी शांतता, रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक या क्षेत्रांमध्ये २२ परिसरामध्ये मापन केले.
ध्वनिमापक उपकरणाद्वारे डेसिबल या एककात त्यांनी मोजमाप केले. यावर्षी शांतता क्षेत्रातील सीपीआर, न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि रहिवासी क्षेत्रातील उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ, ताराबाई पार्क, व्यावसायिक क्षेत्रातील पापाची तिकटी, गंगावेश येथील ध्वनी पातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मानकांपेक्षा थोडी वाढलेली आहे. पण, गेल्यावर्षी पेक्षा या ध्वनी पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे.यंदाची ध्वनी पातळी (डेसिबलमध्ये)
क्षेत्र परिसर ध्वनीपातळी
- शांतता सीपीआर ५५.९७
न्यायालय ४६.५१ जिल्हाधिकारी कार्यालय ४५.६२ शिवाजी विद्यापीठ ४१.७३
- निवासी राजारामपुरी ३९.४७
उत्तरेश्वर पेठ ४६.५२ शिवाजी पेठ ४६.६५ मंगळवार पेठ ३८.११ नागाळा पार्क ४०.२९ ताराबाई पार्क ४६.८७
- वाणिज्य मिरजकर तिकटी ५१.७६
बिनखांबी गणेश मंदिर ४४.९३ महाद्वार रोड ५४.०५ गुजरी ४३.७९ पापाची तिकटी ५९.६४ राजारामपुरी ५१.०२ लक्ष्मीपुरी ४२.९३ शाहूपुरी ४२.०५ गंगावेश ६०.६९ बिंदू चौक ५२.४०
- औद्योगिक शिवाजी उद्यमनगर ४५.१२
वाय. पी. पोवार नगर ४३.४५सीपीसीबीची मार्गदर्शक पातळी (डेसिबलमध्ये, रात्रीच्या वेळी)क्षेत्र पातळीऔद्योगिक ७०वाणिज्य ५५निवासी ४५शांतता ४०