कोल्हापूर : या वर्षीच्या दिवाळीत कोल्हापूर शहरांच्या विविध भागांमध्ये फटाक्यांचा आवाज कमी राहिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मीपूजनादिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. रहिवासी क्षेत्रात आवाजाची पातळी कमी झाली आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी दिली.विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने यावर्षी औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी आणि शांतता क्षेत्रनिहाय शहरातील २२ ठिकाणी रविवारी (दि. २७) ते मंगळवार (दि. २९) दरम्यान पाहणी केली. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. त्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीत गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी उद्यमनगर आणि वाय. पी. पोवारनगर परिसर वगळता अन्य ठिकाणी फटाक्यांचा आवाज कमी राहिला.
शांतता क्षेत्रातील आवाजाने मर्यादा ओलांडली. जास्तीत जास्त आवाज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाल्याचे निदर्शनास आले. कोल्हापूरकरांमध्ये प्रदूषणाबाबत झालेली जागृती यामुळे फटाक्यांचा आवाज कमी झाला आहे. हे शहराच्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहे.
पर्यावरणशास्त्र अधिविभागातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. ए. एस. जाधव, डॉ. संदीप मांगलेकर, संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, एम. एस्सी. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नीलेश शिंगाडे, सूरज पोवार, विनायक तुरंबे, शीतल पाटील यांनी ध्वनिपातळी मोजण्याचे काम केले असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा आवाज (डेसिबलमध्ये)शहरातील ठिकाणे २०१८ २०१९
शांतता क्षेत्र
- सीपीआर ६०.९० ५२.७६
- न्यायालय ६२.६० ५०.६३
- जिल्हाधिकारी कार्यालय ६१.१० ५५.३५
- शिवाजी विद्यापीठ ५४.३० ५०.५४रहिवासी क्षेत्र
- राजारामपुरी ५४.५० ५३.३१
- उत्तरेश्वर पेठ ६२.८० ६१.६५
- ताराबाई पार्क ५६.९० ५४.७८
- शिवाजी पेठ ५८.९० ५५.५६
- नागाळा पार्क ५५.९० ५२.९६व्यावसायिक क्षेत्र
- राजारामपुरी ६४.४० ५८.५२
- मंगळवार पेठ ५४.७० ५३.८५
- शाहूपुरी ६२.३० ५९.०३
- लक्ष्मीपुरी ६१.९० ५८.३१
- महाद्वार रोड ६३.७० ६०.३३
- गुजरी कॉर्नर ६३.४० ६६.२७
- पापाची तिकटी ६२.४० ६५.८४
- बिनखांबी गणेश मंदिर ६०.३० ६३.२१
- मिरजकर तिकटी ५७.८० ५८.३८
- गंगावेश ६२.७० ६०.४०
- बिंदू चौक ६१.५० ६१.६७औद्योगिक क्षेत्र
- शिवाजी उद्यमनगर ५८.५० ५९.६१
- वाय. पी. पोवारनगर ५६.७० ५८.१९
मर्यादा अशाक्षेत्र रात्री
- औद्योगिक ७०
- व्यावसायिक ५५
- रहिवासी ४५
- शांतता ४०