शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

विद्यापीठ प्रतिनिधींचे नामनिर्देशन करा

By admin | Published: November 04, 2014 12:35 AM

कुलगुरू निवड प्रक्रिया : राजभवनाने पाठविले शिवाजी विद्यापीठाला पत्र

कोल्हापूर : कुलगुरू निवडीसाठी विद्यापीठ प्रतिनिधीचे नामनिर्देशन करा, अशा आदेश शिवाजी विद्यापीठाला राजभवनातून दिला आहे. याबाबतचे पत्र विद्यापीठाला आज, सोमवारी प्राप्त झाले आहे. या पत्रामुळे कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला.विद्यमान कुलगुरू डॉ. पवार यांची मुदत दि. २५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत आहे. ही मुदत संपण्याच्या सहा महिने आधी नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होणे व्हावे, असे संकेत आहेत. मात्र, त्याबाबत निवडणुका, आचारसंहिता आदींमुळे काहीच हालचाली झाल्या नव्हत्या; पण कुलगुरू डॉ. पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आपली विद्यापीठातील मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार असल्याचे कुलपती कार्यालयाला कळविले होते. त्यावर दि. ३१ आॅक्टोबरला राजभवनातून कुलगुरू निवडीसाठीच्या समितीसाठी विद्यापीठ प्रतिनिधींचे नामनिर्देशन करा, या आदेशाचे पत्र पाठविले. शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला हे पत्र आज मिळाले. त्यानुसार प्रतिनिधींचे नामनिर्देशन करण्यासाठी २० नोव्हेंबरला विद्यापीठात बैठक होणार आहे. विद्यापीठाच्या सभा व निवडणुका विभागातर्फे ही बैठक घेतली जाणार आहे. राजभवनातून आलेल्या पत्रामुळे कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला अधिकृतपणे प्रारंभ झाला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालीदेखील आता गतीमान होणार आहेत. (प्रतिनिधी)आता शोध नाही, निवड...विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेसाठी २००९ मध्ये नेमलेल्या समितीचे नाव ‘कुलगुरू शोध समिती’ असे होते. मात्र, यावेळी त्यात बदल केला असून, ‘कुलगुरू निवड समिती’ असे राहणार आहे. ही समिती त्रिसदस्यीय आहे. त्यात कुलपती नियुक्त, उच्च व तंत्रशिक्षण विभाग नियुक्त आणि स्थानिक विद्यापीठातील एक असे प्रतिनिधी असणार आहेत.