कोल्हापूर : कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु खासगी डॉक्टर्स त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची माहिती जिल्हा परिषदेकडे किंवा सीपीआर रुग्णालयाकडे देत नसल्याने हे काम केवळ १७ टक्क्यांवर आले असल्याची तक्रार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या आढावा बैठकीत करण्यात आली.जिल्हा परिषदेत झालेल्या या आढावा बैठकीसाठी राज्याचे अभियान कार्यक्रम व्यवस्थापक दिलीप जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांची उपस्थिती होती. पावसाचे प्रमाण वाढल्याने डॉक्टरांनी मुख्यालयी राहण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या.कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे. त्यासाठी संपर्क अभियान सुरू असले तरी सुरुवातीच्या काळात रुग्ण दवाखान्यात येत नाहीत. त्यामुळे विकृती झाल्यानंतर तो दवाखान्यात येतो आणि मग अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात; याबाबतही यावेळी चर्चा झाली. गरोदर मातांना प्रसूतीनंतर घरी सोडण्याचे प्रमाण सध्या ९० टक्के आहे; ते १०० टक्के करण्याबाबत यावेळी जाधव यांनी सूचना केली. तेव्हा सीपीआर रुग्णालयाला असे वाहन नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
अनुसूचित जाती, जमातीच्या आणि दारिद्र्यरेषेखालील मातांना जननी सुरक्षा योजनेचा १०० टक्के लाभ देणे, मलिग्रे, सरूड आणि वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देणे याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. हर्षला वेदक, डॉ. स्मिता खंदारे यांच्यासह जिल्'ातील तालुका वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, एनआरएचएम कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.मोबाईल मेडिकल युनिटने दुर्गम भागांत सेवा द्यावीप्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाडीवस्त्यांवर जाताना अनेक अडचणी येतात. यासाठीच येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला मोबाईल मेडिकल युनिट देण्यात आले आहे. त्यांनी त्यांची सेवा दुर्गम भागामध्ये देण्याची गरज असून, केवळ रुग्णांची तपासणी एवढेच काम न करता शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही त्यांनी सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा दिलीप जाधव यांनी व्यक्त केली.टॉमीफ्ल्यूच्या गोळ्या लगेच सुरू करास्वाइन फ्लूबाबत मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले, रुग्ण ताप आला म्हणून सुरुवातीला गावपातळीवर उपचार घेतो. नंतर तालुका पातळीवरील डॉक्टरांना दाखवतो. तोपर्यंत आठ-दहा दिवस जातात आणि मग कोल्हापुरात मोठ्या दवाखान्यात येतो. त्यापेक्षा सुरुवातीच्या काळातच त्यांना टॉमीफ्लूच्या गोळ्या सुरू करण्याबाबत डॉक्टरांनी दक्षता घ्यावी.