वायू, ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणाला बाधा येणार असल्याबाबत आजअखेर ग्रामपंचायत, आमदार राजेश पाटील यांनाही निवेदन दिले आहे.
आतापर्यंत ६६ शेतकऱ्यांनी स्टोनक्रशरला विरोध केला असून हरकती नोंदविल्या आहेत तरीही वरिष्ठ व प्रशासकीय पातळीवरून उद्योजकाला ‘ना हरकत दाखला’ दिल्याचे समजते. त्यामुळे स्टोनक्रशरमुळे हानी पोहोचणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन क्रशरला स्थगिती द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात, भीमा नंदनवाडे, अशोक नंदनवाडे, अजित नंदनवाडे, आप्पासाहेब हंचनाळे, महादेव नंदनवाडे, आप्पाजी कुरणे, मुबारक पटेल, वासुदेव नंदनवाडे, अजित नंदनवाडे, संभाजी नंदनवाडे आदींचा समावेश होता.
-----------------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना भीमा नंदनवाडे यांनी निवेदन दिले. यावेळी मुबारक पटेल, अजित नंदनवाडे, आप्पासाहेब हंचनाळे, अशोक नंदनवाडे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १११२२०२०-गड-०७