कोल्हापूर : प्रशासकीय पातळीवर कोट्यवधी रुपयांचे आराखडे तयार करून सुशोभीकरणाच्या केवळ जोर-बैठकाच सुरू असतानाच ऐतिहासिक रंकाळा तलावास पुन्हा एकदा ‘ग्रीन अल्गी’चे ग्रहण लागले असून, त्यामुळे तलावातील जलचर प्राण्यांचा जीव गुदमरायला लागला आहे. तलावाच्या पश्चिम बाजूस काही मासे मेले असल्याचे बुधवारी निदर्शनास आल्याने तातडीने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव नैसर्गिक संकटामुळे तसेच पाण्याच्या प्रदूषणामुळेसतत चर्चेत राहिलेला आहे.
एक-दोन वर्षांच्या अंतराने तलावाचे वैभव धोक्यात येते, त्यावर चर्चा होते. जुजबी उपाययोजना केल्या जातात; पण दुखणं मात्र काही थांबतनाही. काही वर्षांपूर्वी ग्रीन अल्गीने रंकाळा तलावातील पाण्याला ग्रासले होते. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न संपला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ग्रीन अल्गीने पुन्हा डोके वर काढले आहे.वातावरणातील बदल, तलावात मिसळणारे सांडपाणी, नायट्रोजनव फॉस्फरसचे वाढलेले प्रमाण, प्राणवायूची कमतरता या साऱ्या कारणांनी तलावात ग्रीनअल्गीचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे पाण्यावर एक प्रकारची हिरवी चादर लपेटली आहे.विशेष म्हणजे दिवसभर हवानसल्याने तलावातील पाणी संथ राहत आहे.त्यामुळे एरिएशन होत नाही, हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपासून शाम हौसिंग सोसायटीक डून मैलामिश्रित सांडपाणी तलावात मिसळत आहे. सांडपाणी रोखण्यात ड्रेनेज विभागास अपयश आले आहे. ड्रेनेज दुरुस्तीचे कारण देऊन सांडपाणी तलावात सोडले जात आहे.
तलावात मिसळणारे चार नाले महापालिका प्रशासनाने उपाययोजना करून रोखण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु शाम हौसिंग सोसायटीकडून येणारा नाला रोखण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही. सांडपाण्याचा प्रवाहन आणि उपसा करण्याची क्षमता यांचा कुठेही ताळतंत्र बसत नसल्यामुळे थेट तलावात मिसळणारे पाहण्यापलीकडे कर्मचारीही काही करीत नाहीत. सांडपाण्यात नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते आणि हे सांडपाणी तलावात मिसळते. गाळात या घटकांचा समावेश होतो. त्यामुळेच तलावातील पाणी प्रदूषित बनले आहे.तो प्रस्ताव अजून ‘एनजीटी’कडेच?रंकाळा तलावाच्या प्रदूषणाबाबत राष्टÑीय हरित लवादासमोर याचिका दाखल झाली असून, प्रत्येक महिन्याला त्यावर सुनावणी होते. तलाव प्रदूषणमुक्त करण्याकरिता कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, अशी विचारणा लवादाने महापालिकेकडे केली तेव्हा १२५ कोटींचा एक प्रस्ताव सादर केला.परंतु, प्रदूषण रोखण्याकरिता एवढा निधी लागतो का, अशी शंका उपस्थित झाली. त्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये गाळाचा उपसा करण्याच्या कामाचा समावेश आहे.सध्याची स्थिती कशी आहे? तलावाच्या पाण्यात ग्रीन अल्गीचा थर साचलेला आहे.त्यामुळे पाण्यात हिरवी चादर पसरल्याचे दिसते.जलचर प्राण्यांचा जीव गुदमरत आहे.
इराणी खणीकडील बाजूलाकाही मासे मेल्याचे दिसून आले.तलावात किमान ४५ टक्केगाळाचे प्रमाण आहे.गाळात नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे.तातडीचे उपाय काय आहेत?तलावात एरिएशन होणेआवश्यक.त्याकरिता बोटी फिरविणे,पाणी ढवळून काढणे.पाणी शुद्धिकरणात वापरल्या जाणाºया पीएसी पावडरचा डोस वाढविणे.तलावाच्या पाण्यावरील ग्रीनअल्गी सक्शन टॅँकरने ओढूनघेणे. तलावाच्या पश्चिम भागातील चरीतून पाणी सोडणे.