शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Kolhapur: इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, ए. वाय. पाटील यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 1:30 PM

..तर भावी पिढी माफ करणार नाही

तुरंबे : राधानगरी धरणांचा तालुका आहे. या पाण्यावर मूळचा हक्क येथील शेतकऱ्यांचा आहे. तो डावलून जर सुळकुड योजना पाणी नेणार असेल तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे तालुका सरपंच परिषद आणि काळम्मावाडी बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.पाटील म्हणाले, शिवाजीराव खोराटे यांनी पहिली पाणी परिषद सरवडेत घेतली.,स्वर्गीय हिंदुराव पाटील यांच्यासह तत्कालीन नेत्यांनी व्यापक आंदोलन केल्याने धरण झाले. धरणासाठी विस्थापित झालेल्या नऊ गावांचे प्रश्न प्रलंबित आहेत. धरणाची गळती, गार्डनची दुरवस्था, विश्रामगृह दुरवस्था, नियंत्रणासाठी धरणस्थळी अधिकारी नाहीत आणि कार्यालय नाही यांचाही विचार करावे लागेल.आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, दूधगंगा धरणाच्या पाण्याचे लेखापरीक्षण करावे लागेल. ज्याचा हक्क आहे त्यालाच पाणी मिळाले पाहिजे. हे पाणी दुसऱ्या कोणत्याही संस्थेला ज्यांचा या धरणाच्या लाभ क्षेत्राशी काही संबंध नाही त्यांना का द्यायचे? असा सवाल केला. तीव्र लढा उभारून शासनाशी संघर्ष करू. एकवेळ सरकारच्या विरोधात लढाई उभारू पण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, आंदोलन करावे लागले तरी हरकत नाही. शेती आणि पिण्यासाठी लागणारे पाणी हे येथील मूळ शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. त्यांच्यासाठी आम्ही ताकदीने मदत करू. सुळकुड योजनेचा घाट थांबवा नाही तर शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी सत्यजित जाधव, भूषण पाटील, नामदेव चौगले, शहाजी पाटील, बापू किल्लेदार, प्रकाश पोवार, संभाजी देसाई, सिकंदर मुल्लाणी, सागर कोंडेकर, यांनी मनोगते मांडली. यावेळी अध्यक्ष नेताजी पाटील, बिद्री संचालक युवराज वारके, प्रभाकर पाटील, एकनाथ पाटील, नाना पाटील, अरुण जाधव, फिरोजखान पाटील, लहुजी जरग, नानासो पाटील, युवराज वारके, हिंदुराव चौगले, अरुण जाधव, अशोकराव फराकटे, रंगराव किल्लेदार उपस्थित होते.

...तर भावी पिढी माफ करणार नाहीआमच्या आजोबा, पणजोबा यांनी दूधगंगा धरण उभारण्यासाठी संघर्ष केला. या धरणाचे पाणी कर्नाटक, कोल्हापूरला जाते. आता निसर्ग लहरी आहे. पाऊस झालेला नाही. जर हे पाणी सगळे पळवून नेणार असतील, आणि आपण ते थांबवू शकलो नाही तर भावी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे मत सागर कोंडेकर व प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी