शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 1:27 PM

छत्तीस वर्षे शिवसेनेत निष्ठापूर्वक काम केल्यानंतर आणि ‘मातोश्री’ला दैवत मानल्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होण्यात वैयक्तिक स्वार्थ नाही.

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हा भाजपशी आघाडी करून लढविणार आहे. त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चंद्रकांत पाटील व माझ्यात काही व्यावसायिक वाद नव्हता. ते एक मोठे नेते आहेत. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आगामी २०२४ ची विधानसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो प्रमाण मानून पुढील दिशा ठरवू, असे क्षीरसागर यांनी सांगितले. ते म्हणाले, छत्तीस वर्षे शिवसेनेत निष्ठापूर्वक काम केल्यानंतर आणि ‘मातोश्री’ला दैवत मानल्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होण्यात वैयक्तिक स्वार्थ नाही.राज्यात बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची सत्ता येतेय आणि शिंदे यांच्याकडे विकासाची दृष्टी असल्यामुळे आपण त्यांच्या गटात गेलो. माझ्या कामाचे फळ म्हणून पक्षाने आमदार केले. मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाला. या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या तरी विशिष्ट प्रसंगांत एकनाथ शिंदे नेते म्हणून पाठीशी राहिले.

आत्मपरीक्षण करण्याची वेळ..

शिवसेना पक्षप्रमुख, ठाकरे कुटुंब, मातोश्री, तसेच शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यावर टीका करण्याचे क्षीरसागर यांनी टाळले. शिवसेनेत यापूर्वीदेखील आमदार फुटले. शिवसेना संपली नाही. परंतु, आताएवढे ४० आमदार फुटले नव्हते. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणी निवडणार

शिवसेना शिंदे गटाची बांधणी करण्यात येणार असून, शहराची नवीन कार्यकारिणी लवकरच निवडली जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. एकमेकांबद्दल कटुता न येता बाळासाहेब सेनेचे पदाधिकारी नक्कीच चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोठी संधी मिळणारमुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मला मोठी जबाबदारी देतील अशी अपेक्षा आहे. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील, असे क्षीरसागर म्हणाले. तुम्हाला मंत्री करण्याचा शब्द दिला आहे का? अशी विचारणा करता सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, असे सांगून त्यांनी थेट बोलणे टाळले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना