शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

नांगनूरमध्ये लक्षवेधी महिला बसथांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:18 PM

नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील स्मार्ट ग्रामपंचायतीने २०१८-१९च्या ग्राम निधीतून लक्षवेधी महिला बसथांबा बांधला आहे. गावच्या प्रवेशद्वाराच्या वळणावरती हा बसथांबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हलकर्णी : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील स्मार्ट ग्रामपंचायतीने २०१८-१९च्या ग्राम निधीतून लक्षवेधी महिला बसथांबा बांधला आहे. गावच्या प्रवेशद्वाराच्या वळणावरती हा बसथांबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.अनेक गावांमध्ये बसथांब्याची पडझड झाली आहे. फरशा चोरीस गेल्या असून, बैठक व्यवस्था मोडून पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. अगर एखाद्या घराच्या वळचणीचा आधार घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर नांगनूरच्या ग्रामपंचायतीने तयार केलेला हा खास महिला बसथांबा कौतुकाचा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.

प्रवेश करताच नजरेत भरतात ते दोन स्वच्छ भारताचे लोगो. बैठक व्यवस्थेच्या वरील बाजूस आकर्षक डिजीटल फलकावरती घोषवाक्यातून रेखाटली आहे ती प्रबोधनात्मक चित्रावली. प्रत्येकाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे. मग, मुलगी का नको? ‘लेक वाचवा..भविष्य घडवा...’, ‘मुलगा-मुलगी भेद नको’, ‘मुलगी झाली खेद नको’, ‘निरोगी शरीर हाच खरा दागिना’, ‘पर्यावरण वाचवा..भविष्य घडवा..’ , ‘पृथ्वी आपले घर आहे’, ‘पृथ्वी वाचवा..जीवन वाचवा’, ‘पाणी म्हणजे जीवन’, ‘आवरा वेगाला.. सावरा जीवाला’, ‘पाण्याविना जीवन नाही,’ आदी आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व संस्काराची घोषवाक्ये लक्ष वेधून घेत आहेत. शिवबा, जिजाऊंच्या चित्रातून देशाला हवेत शिवबा, जिजाऊ म्हणून स्रियांना सन्मानाने वागवू, असा संदेश देण्यात आला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर